Heeraben Modi 100th Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हीराबेन मोदी 18 जून रोजी करणार 100 व्या वर्षात पदार्पण

मोदी कुटुंबाने त्या दिवशी अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिरात 'भंडारो' (सामुदायिक भोजन) ची योजना देखील आखली आहे. वडनगर येथील हटकेश्वर महादेव मंदिराने पंतप्रधानांच्या आईच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे

Heeraben Modi (संग्रहित संपादित प्रतिमा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हीराबेन मोदी (Hiraba Modi) 18 जून रोजी 100 वर्षांच्या होणार आहेत. हीराबेन यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त वडनगर येथील हटकेश्वर मंदिरात खास पूजा ठेवण्यात आली आहे, ज्यामध्ये पंतप्रधान देखील उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जून रोजी त्यांच्या आईचा 100 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी हीराबेन मोदी यांच्या गांधीनगर येथील निवासस्थानी जाणार आहेत. याशिवाय पावागड येथील माँ काली मंदिरातही पंतप्रधान मोदी ध्वजारोहण करणार आहेत.

यानिमित्ताने गांधीनगर येथील रायसन पेट्रोल पंपापासून 60 मीटर रस्त्याचे ‘पूज्य हिरा मार्ग’ असे नामकरण करण्यात येणार आहे. गांधीनगर महानगरपालिका ‘पूज्य हिरा मार्ग’ असे नामकरण करणार आहे. हिराबेन यांचा जन्म 18 जून 1923 रोजी झाला असून त्या 18 जून 2022 रोजी त्यांच्या 100 व्या वर्षात पदार्पण करणार असल्याचे पंतप्रधानांचे धाकटे भाऊ पंकज मोदी यांनी सांगितले.

पीएम मोदी हे 18 जून रोजी गुजरातच्या एका दिवसाच्या दौऱ्यावर असणार आहेत. मोदी कुटुंबाने त्या दिवशी अहमदाबादच्या जगन्नाथ मंदिरात 'भंडारो' (सामुदायिक भोजन) ची योजना देखील आखली आहे. वडनगर येथील हटकेश्वर महादेव मंदिराने पंतप्रधानांच्या आईच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. कार्यक्रमात भजन संध्या, शिव आराधना आणि सुंदरकांड पाठ यांचा समावेश असेल. (हेही वाचा: मोदी सरकार पुढील दीड वर्षात 10 लाख नोकर्‍या देण्याच्या तयारीत; PM Narendra Modi यांचे मंत्रालयांना निर्देश)

यापूर्वी 11 मार्च रोजी पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असताना अहमदाबादमध्ये त्यांच्या आईची भेट घेतली होती. कोविड-19 साथीच्या आजारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन वर्षांच्या कालावधीनंतर त्यांच्या आईची भेट घेतली. या महिन्यातील पंतप्रधान मोदींचा हा दुसरा गुजरात दौरा असेल. तत्पूर्वी, 10 जून रोजी त्यांनी नवसारीच्या आदिवासी भागात 3,050 कोटी रुपयांच्या 7 प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि परिसरातील पाणीपुरवठा सुधारण्याच्या उद्देशाने 14 हून अधिक प्रकल्पांची पायाभरणी केली.