Bus Driver Heart Attack: बस चालवताना चालकाला हृदयविकाराचा धक्का, मृत्यूपूर्वी काहीच क्षण आधी वाचवले 60 प्रवाशांचे प्राण

ओडिशा (Odisha) राज्यातील बालासोर (Balasore) जिल्ह्यात एका बस चालकाला बस चालवतानाच हृदयविकाराचा झटका (Bus Driver Heart Attack) आला. मात्र, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच काही सेकंद आगोदर या चालकाने तत्काळ बस थांबविली. बस थांबवल्यानंतरच्या काहीच क्षणामध्ये त्याचा मृत्यू झाला.

Heart Attack | Representational Image (Photo Credits: Pixabay)

ओडिशा (Odisha) राज्यातील बालासोर (Balasore) जिल्ह्यात एका बस चालकाला बस चालवतानाच हृदयविकाराचा झटका (Bus Driver Heart Attack) आला. मात्र, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच काही सेकंद आगोदर या चालकाने तत्काळ बस थांबविली. बस थांबवल्यानंतरच्या काहीच क्षणामध्ये त्याचा मृत्यू झाला. बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील 60 हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. प्राप्त माहितीनुसार, बालासोर जिल्ह्यातील पातापूर चक येथे मंगळवारी पहाटे ही घटना घडली. पश्चिम बंगालमधून पर्यटकांना पंचलिंगेश्वर मंदिराकडे घेऊन जाणारी ही बस अचानक थांबवली गेली. नंतर लक्षात आले की, चालक शेख अख्तर यांना हृदयविकाराचा झटका आला.

अस्वस्थता जाणवल्यानंतर, चालक अख्तर यांनी स्वत: बेशुद्ध होण्यापूर्वी बस रस्त्याच्या कडेला थांबवली. या घटनेमुळे घाबरलेल्या प्रवाशांनी ताबडतोब स्थानिक रहिवाशांची मदत मागितली, त्यांनी अख्तरला यांना तातडीने जवळच्या निलगिरी उपविभागीय रुग्णालयात नेले. रुग्णालयातील डॉक्टरांनी प्राथमिक उपचारांसाठी तपासणी केली. मात्र, उपचारांपूर्वीच अख्तर यांचा मृत्यू झाल्याचे त्यांनी घोषीत केले. (हेही वाचा, Bus Driver Dies Of Cardiac Arrest: ओडिशामध्ये बस चालकाला आला हृदयविकाराचा झटका; ड्रायव्हरच्या प्रसंगावधानाने थोडक्यात बचावले 48 प्रवाशांचे प्राण)

बस चालकाच्या मृत्यूनंतर बसमधील प्रवासी अमित दास यांनी सांगितले की, चालकाची तब्येत अचानक बिघडली. पण, तो खरा जबाबदार चालक होता. त्याने प्रकृतीत बिघाड झाल्याचे लक्षात येताच बस तातडीने रस्त्याच्या बाजूला घेऊन थांबवली. इतकेच नव्हे तर आम्ही बसमधील प्रवासीही त्यांच्यामुळे सुरक्षीत राहीलो. बस सुरु असतानाच अशी घटना घडली असती तर मोठ्या धोक्याला सामोरे जावे लागले असते, असेही या बसमधील प्रवाशाने सांगितले.

एका सहप्रवाशाने सांगितले की, बस चालक अख्तरची तब्येत झपाट्याने खालावली. त्याने तातडीने बसवर नियंत्रण मिळवले. पण लगेच तो कोसळला. स्थानिकांनी त्यांना रुग्णालयात नेले. पण उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी त्यांना उपचारापुर्वीच मृत घोषीत केले. दोन्ही प्रवासी आणि स्थानिक रहिवाशांनी अख्तरच्या त्वरीत विचार आणि निर्णायक कृतींचे कौतुक केले आणि संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी त्याची भूमिका खरोखरच इतर चालकांसाठी मार्गदर्शक असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

धावत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका येणे, अथवा तत्सम काही प्राकृतीत व्याधी निर्माण होऊन अपघात घडण्याच्या घटना यापूर्वीही अनेकदा घडल्या आहेत. अशा अपघातांमध्ये प्रवाशांचा नाहक बळी जातो. अशीच एक घटना पुणे येतेही घडली होती. महिलांचा एक समूह पर्यटनाला निघाला होता. रस्त्यात अचानक चालकाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे वाहनावरचे नियंत्रण सुटले. गाडीतील महिलेने तातडीने स्ट्रेअरींग सांभाळत ब्रेक दाबला आणि पुढील अनर्थ टळला. त्यामुळे चालकांच्या आरोग्याचा मुद्दा अलिकडे वारंवार ऐरणीवर येतो आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now