Health Scare in Air India AI130: लंडन-मुंबई विमान प्रवासात क्रू मेंबर्स सह प्रवाशांची बिघडली तब्येत; फूड पॉयझनिंग चा अंदाज

विमान प्रवासात कमी ऑक्सिजन पुरवठा, ज्यामुळे हायपोक्सिया (Hypoxia) होऊ शकतो, त्यामुळे विमानात मळमळ आणि चक्कर येऊ शकते, तसेच अन्नातून विषबाधा होऊ शकते.

एअर इंडियाचे विमान (छायाचित्र: X/ @airindia/ANI)

Air India च्या AI130 या लंडन Heathrow ते मुंबई विमान प्रवासामध्ये क्रू मेंबर्स सह पाच प्रवाशांची तब्येत बिघडल्याची घटना समोर आली आहे. एअर इंडियाने या घटनेची माहिती एका माहितीपत्रकातून देताना मुंबई मध्ये विमान लॅन्ड झाल्यानंतर त्यांना तातडीने मेडिकल रूम मध्ये नेण्यात आल्याची माहिती दिली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून सातही जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

23 जून दिवशी लंडन च्या हिथ्रो ते मुंबई विमानप्रवासात दिलेल्या विमानातील जेवणात फूड पॉयझनिंग झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये पाच प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्सना जेवणानंतर मळमळणं, चक्कर आल्यासारखं वाटणं असा त्रास जाणवत होता. विमान मुंबई मध्ये उतरल्यानंतर त्यांच्यावरील उपचारासाठी तातडीने मेडीकल टीम सज्ज ठेवण्यात आली होती. विमान लॅन्ड झाल्यानंतर दोन प्रवासी आणि केबिन क्रू यांना त्रास जाणवत होता त्यामुळे त्यांना उपचारासाठी नेण्यात आले आणि नंतर डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आहे.

एअर इंडियाने असेही म्हटले आहे की त्यांनी या घटनेची तक्रार नागरी उड्डयन महासंचालनालय, विमान वाहतूक सुरक्षा नियामक यांना केली आहे. AI-130 हे विमान Boeing 777 विमानाने चालवले जात होते. अहमदाबाद अपघातानंतर ज्या विमानाची अधिक तपासणी करण्यात येत आहे ते बोईंग ७८७ ड्रीमलायनर आहे. Technical Snag On Air India Express Dubai Flight: एअर इंडिया एक्सप्रेसच्या दुबईला जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड .

Hypoxia चा अंदाज

एअर इंडियाच्या विमानात प्रवाशांना नेमका का त्रास झाला? याचे कारण तपासले जात आहे. TOI च्या वृत्तानुसार, एका सूत्राने दिलेल्या माहितीमध्ये  केबिनमध्ये दाब कमी होण्याच्या समस्येमुळे प्रवाशांच्या केबिनमध्ये ऑक्सिजनची पातळी कमी होऊ शकते, परंतु नंतर ऑक्सिजन मास्क ओव्हरहेड पॅनलवरून खाली पडतात, जे या उड्डाणादरम्यान घडले नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement