HDFC Bank ग्राहकांना आता RuPay Credit Card वरही UPI वापरण्याची मुभा
ग्राहकांना आता क्रेडीट कार्ड अधिक ठिकाणी वापरण्याची संधी मिळणार आहे. तर मर्चंट्सना कार्डचा वापर वाढला असल्याने अधिक ग्राहकांसोबत आर्थिक व्यवहाराची संधी मिळणार आहे.
HDFC Bank आणि National Payments Corporation of India कडून आज एचडीएफसी ग्राहकांसाठी मोठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. एचडीएफसीचे युजर्स आता त्यांचे RuPay Credit Card भीम अॅप वरील यूपीआय सोबत वापरू शकणार आहेत. एचडीएफसी ही देशातील पहिली खाजगी बॅंक आहे जी आपल्या ग्राहकांना RuPay Credit Card सह यूपीआय सेवा देत आहे.
एचडीएफसी बँकेच्या रुपे क्रेडिट कार्डचा UPI नेटवर्कशी संबंध जोडल्यामुळे आम्ही आमच्या ग्राहकांना डिजिटल पेमेंट करण्यासाठी आणखी लवचिकता आणि सुविधा देऊ शकतो. असं मत Parag Rao, Country Head, Payments, Consumer Finance, Technology and Digital Banking, HDFC Bank यांनी मांडलं आहे. भारतातील सर्वात मोठी कार्ड इश्युअर बॅंक देखील एचडीएससी आहे. त्यामुळे 'ग्राहकांच्या बदलत्या गरजांना अनुकूल असा पर्याय निवडण्यास सक्षम आहेत याची खात्री करण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो. कालांतराने आम्हाला खात्री आहे की यामुळे पेमेंट लँडस्केप आणखी वाढेल आणि या उपक्रमासाठी NPCI सोबत भागीदारी करणारी पहिली खाजगी क्षेत्रातील बँक असल्याचा आम्हाला गौरव आहे.' असेही ते म्हणाले आहेत.
ग्राहकांना आता क्रेडीट कार्ड अधिक ठिकाणी वापरण्याची संधी मिळणार आहे. तर मर्चंट्सना कार्डचा वापर वाढला असल्याने अधिक ग्राहकांसोबत आर्थिक व्यवहाराची संधी मिळणार आहे.
मीडीया रिपोर्ट्सनुसार आता SBI Card, ICICI Bank, आणि Axis Bank देखील आता त्यांच्या RuPay Credit Card सह यूपीआय फीचर देण्यास सज्ज होत आहे. मार्च च्या आसपास ही सेवा सुरू होऊ शकते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)