हरियाणा: वडिलांनी नवी कार खरेदी करण्यास नकार दिल्याने संतापलेल्या मुलाने BMW फेकली नदीत

हरियाणा (Haryana) येथील एका तरुणाने वडिलांनी नवीन कार घेऊन दिली नाही म्हणून त्याच्याजवळ असलेली लक्झरी बीएमडब्लू (BMW) कार चक्क नदीत फेकली असल्याचा प्रकार समोर आला आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

हरियाणा (Haryana) येथील एका तरुणाने वडिलांनी नवीन कार घेऊन दिली नाही म्हणून त्याच्याजवळ असलेली लक्झरी बीएमडब्लू (BMW) कार चक्क नदीत फेकली असल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणाला वडिलांचा या गोष्टीमुळे प्रचंड राग आल्याने त्याने हे कृत्य केले आहे. नदीत कार फेकल्याने पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

यमुनानगर मध्ये राहणाऱ्या एका तरुणाला नवी जॅग्वार ही गाडी हवी होती. त्यासाठी त्याने वडिलांकडे ही कार घेण्यासाठी त्यांच्यामागे तगादा लावला होता. मात्र वडिलांनी नवी जॅग्वार घेण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या तरुणाने चक्क बीएमडब्लू नदीत ढकलून दिली.(आंतरराष्ट्रीय प्रवास करण्यासाठी आता 4 तास आधी विमानतळावर पोहचावे लागणार)

या प्रकारानंतर तेथील स्थानिकांच्या मदतीने नदीत फेकलेली बीएमडब्लू बाहेर काढण्यात आली आहे. तसेच तरुणाला अटक करत पोलीस या प्रकाराची अधिक चौकशी करत आहेत. परंतु हरियाणा येथील तरुणाईला सध्या महागड्या गाड्या वापरण्याची क्रेज असल्याने पालकांकडे अशा पद्धतीचा हट्टीपणा करताना दिसून येतात.