Haryana: 11 वी मध्ये शिकणाऱ्या मुलासोबत शिक्षिकेने काढला पळ, पोलिसांकडून अटक
मात्र असे एक प्रकरण समोर आले की, शिक्षिकेसोबतच्या एका अफेअरची चर्चा जोरदार सुरु झाली आहे.
Haryana: काही वेळेस असे होते की, जेव्हा शाळेतील मुलामुलींचे अफेअर सुरु झाल्यास त्याची चर्चा सुरु होते. मात्र असे एक प्रकरण समोर आले की, शिक्षिकेसोबतच्या एका अफेअरची चर्चा जोरदार सुरु झाली आहे. ही घटना अशावेळी समोर आली जेव्हा 11 वी मध्ये शिक्षकणाऱ्या एका मुलासोबत महिला शिक्षिकेने पळ काढला. खरंतर हे प्रकरण हरियाणा मधील पानीपत येथील आहे. येथील एका महिला शिक्षिका घरात एकटीच राहत होती. तेथे एक अल्पवयीन मुलगा तिच्याकडे शिकण्यासाठी जात होता. याच दरम्यान महिलेचे आपल्या शिष्यावर प्रेम जडले आणि असे काही घडले की त्याबद्दल कधीच कोणीही विचार केला नव्हता.
महिला तिच्याकडे शिकण्यासाठी येणाऱ्या मुलासोबत फरार झाली. पण आपला मुलगा घरी आलाच नाही म्हणून शिक्षिकेवर अपहरणाचा गुन्हा पोलिसात दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांची टीम सक्रिय होत त्यांनी या दोघांचा तपास सुरु केला. त्यानंतर पोलिसांनी महिला शिक्षिकेला अटक केली. पानीपतच्या पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने महिला शिक्षिकेला त्या अल्पवयीन मुलासोबत ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांकडून याचा अधिक तपास केला जात आहे. त्याचसोबत महिला शिक्षिकेची काउंसिलिंग सुद्धा केली जात आहे. अपहरण करण्यामागील महिलेचे उद्देश काय होता असे सुद्धा तिला विचारण्यात आले.
असे सांगितले जात आहे की, महिला त्या मुलाची वर्गशिक्षिका सुद्धा असून ती एका खासगी शाळेत शिकवते. हे प्रकरण अधिक उघडकीस अशावेळी आले जेव्हा मुलाच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले की, नेहमीप्रमाणेच 29 मे रोजी मुलगा दुपारी 2 वाजता शिक्षिकेच्या घरी गेला. मात्र शिकवणीनंतर तो घरी आलाच नाही. तर सदर शिक्षिकेचा घटस्फोट झाला असून आपल्या माहेरी ती राहते.(Bengaluru Robbery: विचित्र चोरी; 89,000 रुपयांचे गुलाबजाम, रसगुल्ला आणि खाद्य तेल लंपास; बेंगळुरु येथील हॉटेलध्ये चोरट्यांचा प्रताप)
लॉकडाउन मुळे शाळा बंद असल्याने प्रत्येक विद्यार्थी चार तास ट्यूशनसाठी शिक्षिकेच्या घरी जात होता. महत्वाची बाब अशी की, दोघांनी एकही सामान घेऊन न जाता घरातून पळ काढला होता. मौल्यवान वस्तूंमध्ये फक्त महिलेच्या हातात सोन्याची अंगठी होती. या दोघांच्या घरातल्यांनी ते दोघे बेपत्ता झाल्याचे सांगितले. त्यानंतरच दोघांचा शोध घेतला गेला.