Haryana Shocker: पत्नी आणि तिचा संभाजीनगर येथील प्रियकराचा अश्लील नृत्याचा व्हिडिओ पाहून पतीची आत्महत्या; मृत्यूपूर्वी केले पैशांसाठी मानसिक छळाचे आरोप

मगनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये त्याने आपली व्यथा मांडली. त्याने सांगितले की, माझी पत्नी आणि तिचा प्रियकर दीपक मला सतत त्रास देत आहेत. त्यांनी माझ्या वडिलांची हत्या करण्याचा आणि जमीन विकण्याचा दबाव टाकला, पण मी ते करू शकत नाही. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे.

Haryana Shocker: पत्नी आणि तिचा संभाजीनगर येथील प्रियकराचा अश्लील नृत्याचा व्हिडिओ पाहून पतीची आत्महत्या; मृत्यूपूर्वी केले पैशांसाठी मानसिक छळाचे आरोप
Suicide | (Photo credit: archived, edited, representative image)

हरियाणातील (Haryana) रोहतक जिल्ह्यात मगन उर्फ अजय या 32 वर्षीय पुरुषाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्याच्या पत्नी दिव्या आणि तिचा कथित प्रियकर दीपक, जो महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे पोलीस अधिकारी आहे, यांच्याकडून सततच्या छळामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. मगनने आत्महत्येपूर्वी एक 4 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, ज्यामध्ये त्याने दिव्याने दीपकसोबत अश्लील नृत्याचा व्हिडिओ पाठवल्याचा आणि त्याला पैशांसाठी आणि जमीन विकण्यासाठी दबाव टाकल्याचा दावा केला. या घटनेने स्थानिक समुदायात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मगन आणि दिव्याची भेट 2019 मध्ये सोशल मीडियावर झाली होती, आणि त्यांनी नंतर कोर्टात लग्न केले. सुरुवातीला मगनच्या कुटुंबाने या लग्नाला विरोध केला होता, परंतु दिव्याने मुलाला जन्म दिल्यानंतर त्यांनी तिला स्वीकारले. मगनच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, दिव्या नोकरी करत होती, परंतु ती कोणती नोकरी आहे याबाबत कधीच स्पष्ट बोलली नाही. ती अनेकदा कामाच्या निमित्ताने घराबाहेर राहत असे, आणि मार्च 2025 मध्ये ती घर सोडून गेली आणि परत आली नाही. नंतर समजले की, ती महाराष्ट्रातील संभाजीनगर येथे दीपकसोबत राहत होती.

मगनने आपल्या शेवटच्या व्हिडिओत सांगितले की, दिव्याने दीपकच्या बढतीसाठी त्याच्याकडे 3.5 लाख रुपये मागितले होते. त्याने कसेतरी जमा करून 2 लाख रुपये दिले. मात्र दिव्या आणि दीपक यांनी आणखी 1.5 लाख रुपये आणि मगनच्या वडिलांची हत्या करून त्यांची 15 ते 20 कोटींची जमीन विकण्याचा दबाव टाकला. या दबावाला कंटाळून आणि दिव्याने पाठवलेल्या अश्लील नृत्याच्या व्हिडीआमुळे मगनने नैराश्यात आत्महत्या केली.

दिव्याचा व्हिडीओ-

मगनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये त्याने आपली व्यथा मांडली. त्याने सांगितले की, माझी पत्नी आणि तिचा प्रियकर दीपक मला सतत त्रास देत आहेत. त्यांनी माझ्या वडिलांची हत्या करण्याचा आणि जमीन विकण्याचा दबाव टाकला, पण मी ते करू शकत नाही. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे. त्याने पोलिसांना दिव्या आणि दीपकवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आणि आपल्या मुलाची काळजी त्याच्या पालकांनी घ्यावी, अशी इच्छा व्यक्त केली. या व्हिडिओनंतर मगनचा मृतदेह त्याच रात्री गावात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. त्याच्या कुटुंबाने व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचा शोध घेतला आणि मृतदेह सापडला. मगनच्या आत्महत्येनंतर, दिव्याचा दीपकसोबत अश्लील नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले. (हेही वाचा: Andhra Pradesh Shocker: आंध्र प्रदेशमध्ये लग्नाच्या एका महिन्यानंतर आढळला तरुणाचा मृतदेह; कुटुंबाने केला 'पत्नीचे विवाहबाह्य' संबंध असल्याचा आरोप)

या प्रकरणी रोहतक पोलिसांनी मगनच्या आत्महत्येनंतर गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय यांनी सांगितले की, दिव्याचा शोध घेण्यासाठी पथक तिच्या माहेरी हिसार येथे गेले, परंतु तिच्या कुटुंबाने सांगितले की, त्यांचा तिच्याशी बराच काळ संपर्क नाही. पोलिसांनी दिव्या आणि दीपक यांच्याविरुद्ध तपास सुरू केला आहे, आणि त्यांना लवकरच ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे. मगनच्या मोबाइल फोनमधील व्हिडीओ आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. पोलिसांनी असेही नमूद केले की, मगनने आपल्या व्यक्तीत दीपक हा संभाजीनगर येथील पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले आहे, आणि या दाव्याची पडताळणी सुरू आहे. मात्र, दीपकच्या ओळखीची पुष्ट्यी अद्याप झालेली नाही.

(The above story first appeared on LatestLY on Jun 24, 2025 04:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).