Haryana Violence: हरियाणातील हिंसाचारात दोन होमगार्डचा मृत्यू, जिल्ह्यात कलम 144 लागू

विश्व हिंदू परिषद आणि मातृशक्ती दुर्गा वाहिनीच्या वतीने काढण्यात आलेल्या जलभिशेषक यात्रेच्या दरम्यान ह प्रकार घडला आहे.

Haryana Violence (Image Credit - ANI Twitter)

हरियाणातील (Hariyana) नूह येथे विश्व हिंदू परिषदेने (VHP) काढलेल्या धार्मिक मिरवणुकीत सोमवारी झालेल्या संघर्षात दोन होमगार्ड आणि एका नागरिकासह तीन जण ठार झाले आणि अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले. सोमवारी विश्व हिंदू परिषदेच्या मिरवणुकीला जमावाने रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा धार्मिक मिरवणुकीदरम्यान हरियाणाच्या नूहमध्ये सुरुवातीला हिंसाचार उसळला. दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाल्याने दगडफेक आणि गाड्या पेटवण्यात आल्या. (हेही वाचा - Samruddhi Mahamarg Thane: शाहापूरात मोठी दुर्घटना, समुध्दी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी गर्डर मजूरांच्या अंगावर कोसळली; 15 ते 20 जणांचा मृत्यू)

विश्व हिंदू परिषद आणि मातृशक्ती दुर्गा वाहिनीच्या वतीने काढण्यात आलेल्या जलभिशेषक यात्रेच्या दरम्यान ह प्रकार घडला आहे. जलाभिषेक रोखण्याचा प्रयत्न करणारा जमाव आणि यात्रेतील भाविक यांच्यात झालेल्या हिंसाचारात दोन होमगार्ड आणि मृत्यू झाला आहे. तर दहापेक्षा अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. नूहसह हरयाणाच्या काही जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. या संघर्षानंतर मोबाईल इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

पाहा ट्विट -

नूहमध्ये जातीय हिंसेनंतर जवळच्या गुरुग्राम जिल्ह्यातील सोहना येथे जाळपोळ सुरू झाली. चार वाहने आणि एका दुकानाला आग लावण्यात आली आहे. रस्त्यांवर सातत्याने फ्लॅग मार्च काढला जात आहे. गुरुग्रामचे उपयुक्त निशांत कुमार यादव आणि फरीदाबाद पोलीस आयुक्त विकास कुमार अरोरा यांनी प्रक्षोभक प्रतिक्रिया देणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.