Haridwar Shocker: ब्लड कॅन्सर बरा करण्यासाठी मुलाला 5 मिनिटे गंगा नदीत बुडवून ठेवले; चिमुकल्याचा मृत्यू, कुटुंबाला अटक (Watch Video)

मुलाच्या पालकांनी सांगितले की, त्यांच्या मुलावर सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते मात्र डॉक्टरांनी हार मानल्यावर ते त्याला हरिद्वारला घेऊन आले.

Death | Representational Image (Photo Credits: Pixabay)

उत्तर प्रदेशच्या हरिद्वार (Haridwar) कोतवाली परिसरात बुधवारी दुपारी एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला. दिल्लीतील एक कुटुंब आपल्या 4 वर्षाच्या मुलासह हरकी पैड़ी (गंगा घाट) येथे पोहोचले होते, जिथे मुलाचा मृत्यू झाला. येथे उपस्थित लोकांनी मुलाच्या आईने आणि त्याच्या काकीने मुलाला गंगेत बुडवून मारल्याचा आरोप केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले, जेथे डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. पोलिसांनी मुलाचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

एसपी सिटी स्वतंत्र कुमार सिंह यांनी सांगितले की, पती-पत्नी त्यांच्या मुलाला घेऊन हरिद्वारला आले होते. त्यांच्यासोबत मुलाची काकीही होती. मुलगा ब्लड कॅन्सरने ग्रस्त असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. मुलाच्या पालकांनी सांगितले की, त्यांच्या मुलावर सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते मात्र डॉक्टरांनी हार मानल्यावर ते त्याला हरिद्वारला घेऊन आले. एका बाबाच्या सांगण्यावरून मुलाला गंगेत स्नान घालण्यासाठी ते या ठिकाणी आले होते. मात्र मुलाच्या काकीने मुलाला तब्बल 5 मिनिटे गंगेखाली बुडवून ठेवले त्यामुळे मुलाचा मृत्यू झाला.

हा व्हिडिओ तुम्हाला विचलित करू शकतो-

कुमार यांनी सांगितले की, आरोपी कुटुंबाला अटक करण्यात आली आहे. ड्रायव्हर कुलदीप कुमारने सांगितले की, तो सकाळी नऊच्या सुमारास दिल्लीहून आपल्या टॅक्सीने कुटुंबासह हरिद्वारसाठी निघाला होता. मुलगा गाडीमध्ये आजारी दिसत होता. त्याला एका चादरीमध्ये गुंडळळे होते. हरिद्वारला पोहोचल्यावर त्याची प्रकृती आणखीनच बिघडली होती. त्यानंतर ते मुलाला गंगेत स्नान घालण्यासाठी गंगा घाटावर पोहोचले. (हेही वाचा: Man Dragged By Car in Bengaluru: बेंगळुरूमध्ये वेगवान कारने दिली व्यक्तीला धडक; बोनेटवर अनेक मीटरपर्यंत नेले, घटना CCTV मध्ये कैद)

या ठिकाणी मुलाला गंगेत बुडवले गेले. हा प्रकार पाहून तिथे उपस्थित लोकांना काहीतरी विचित्र वाटले. मुलगा बराच वेळ पाण्याखाली राहिला व त्यानंतर गदारोळ झाला. उपस्थित लोकांनी त्याच्या आई-वडिलांवर मुलाची पाण्यात बुडवून हत्या केल्याचा आरोप केला. यानंतर त्यांना मारहाणही करण्यात आली. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.