शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
त्यावरुन राष्ट्रीय पातळीवर राजकारण तापले होते. तसेच, संजय राऊत आणि योगी आदीत्यनाथ यांच्यामध्ये ट्विटरवॉरही रंगल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच काही काळ 'सामना'ही रंगला होता.
शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मी त्यांचा नेहमीच आदर करत आलो आहे. अयोध्या लढाईत नेहमीच मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या कारकिर्दीत राम मंदिर निर्माण होवो हीच शुभेच्छा!, अशी भावना खा. राऊत यांनी व्यक्त केली आहे.
कोरोना व्हायरस संकटामुळे घेण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात पालघर येथे दोन साधू आणि त्यांच्या वाहन चालकाची जमावाने हत्या केली होती. त्यावरुन राष्ट्रीय पातळीवर राजकारण तापले होते. तसेच, संजय राऊत आणि योगी आदीत्यनाथ यांच्यामध्ये ट्विटरवॉरही रंगल्याचे पाहायला मिळाले होते. तसेच काही काळ 'सामना'ही रंगला होता. (हेही वाचा, Coronavirus: 'हा मूर्खपणाच नव्हे तर मस्तवालपणाही!' मरकज प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांची टीका)
ट्विट
पालघर येथे साधूंची हत्या झाल्यानंतर योगी आदित्यानथ यांनी मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला होता. दरम्यान, पुढे काही काळातच मध्यप्रदेशमध्ये बुलंदशहर येथे काही साधुंची हत्या झाली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरुन संवाद साधत प्रत्युत्तर दिले होते.