Haj Yatra 2024: हज यात्रेसाठी भारत आणि सऊदी अरब यांच्यात द्विपक्षीय करार, 1,75,000 नागरिक करणार यात्रा
भारत आणि सौदी अरेबियाने 2024 मध्ये वार्षिक हज (Haj Yatra 2024) यात्रेसाठी 1,75,025 यात्रेकरूंचा कोटा वाटप करण्यासाठी औपचारिकपणे द्विपक्षीय करारावर (India and Saudi Arabia Sign Bilateral Agreement) स्वाक्षरी केली आहे.
भारत आणि सौदी अरेबियाने 2024 मध्ये वार्षिक हज (Haj Yatra 2024) यात्रेसाठी 1,75,025 यात्रेकरूंचा कोटा वाटप करण्यासाठी औपचारिकपणे द्विपक्षीय करारावर (India and Saudi Arabia Sign Bilateral Agreement) स्वाक्षरी केली आहे. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी यांनी सौदी अरेबियाचे (Saudi Arabia) हज आणि उमराह मंत्री डॉ. तौफिक बिन फौझान तसेच, भारताचे (India) प्रतिनिधित्व करणारे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांच्या उपस्थितीत जेद्दाह येथे एका समारंभात या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. अधिकृत माहितीनुसार, सन 2024 मध्ये भारतासाठी एकूण हज कोट्यात 1,75,025 यात्रेकरूंचा समावेश आहे. ज्यात 1,40,020 जागा हज समितीमार्फत जाणाऱ्यांसाठी राखीव आहेत आणि अतिरिक्त 35,005 यात्रेकरूंना खाजगी ऑपरेटरद्वारे या यात्रेस जाता येणार आहे. द्विपक्षीय करार हा वार्षिक तीर्थयात्रा आयोजित करण्यासाठी आणि भारतीय यात्रेकरूंचा सहज सहभाग सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
आखाती देशाकडून भारताला सहकार्याचे आश्वासन
भारत आणि सौदी अरेबीया यांच्यात झालेल्या बैठकीत सौदीने भारताच्या डिजिटल उपक्रमांचे कौतुक केले. ज्याचा उद्देश हज यात्रेकरूंसाठी सुलभता आणि सुविधा वाढवणे आहे. आखाती देशाने भारताला या संदर्भात सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. या बैठकीनंतर स्मृती इराणी यांनी सर्वसमावेशकतेच्या वचनबद्धतेवर भर देत हज यात्रा करण्यासाठी मेहरामशिवाय महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या भारताच्या प्रस्तावावर भर दिला. (हेही वाचा, Haj Application Form 2023: हज यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु, हज कमिटी ऑफ इंडियाने मागवले अर्ज; जाणून घ्या तपशील)
स्मृती इराणी यांच्याकडून एक्सद्वारे माहिती
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी X वर पोस्ट करत म्हटले की, की भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील द्विपक्षीय हज कराराची औपचारिक घोषणा करताना मला आनंद होत आहे. माझ्यासोबत परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरनही होते. आम्ही सौदी अरेबियाच्या उमराह मंत्री यांच्याशी परस्पर हितसंबंध सामायिक करण्यासाठी चर्चा केली आणि करार केला. ते म्हणाले की सौदी शिष्टमंडळाने यात्रेकरूंना आवश्यक असलेली अंतिम माहिती प्रदान करण्याच्या भारताच्या डिजिटल उपक्रमाचे कौतुक केले. सौदी अरेबियाने प्रवासात प्रवाशांच्या सुविधांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
एक्स पोस्ट
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती इराणी आणि परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन सौदीची राजधानी जेद्दाहमध्ये आहेत. यावेळी त्यांनी सौदीचे हज आणि उमराह मंत्री डॉ. तौफिक बिन फौजान यांच्यासोबत द्विपक्षीय हज करार-2024 वर स्वाक्षरी केल्याचे सांगितले. एका सरकारी निवेदनानुसार, हज 2024 साठी भारतातून 1,75,000 यात्रेकरूंचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्याच वेळी, 1,40,020 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत, ज्यांचा हज समितीच्या माध्यमातून आणखी विस्तार केला जाईल. त्याच्या 35,005 यात्रेकरूंना खाजगी ऑपरेटरद्वारे पुढे जाण्याची परवानगी दिली जाईल.