Gyanvapi Mosque Case: ज्ञानवापी मशीद खटला जिल्हा न्यायालयाकडे वर्ग, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
या दिवाणी खटल्याची संवेदनशीलता लक्षात घेऊन हा खटला दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग वाराणसी येथून जिल्हा न्यायाधीश वाराणसीकडे वर्ग करण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
ज्ञानवापी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, दाव्याच्या हस्तांतरणावर मशीद समितीच्या याचिकेवर जिल्हा न्यायाधीश प्राधान्याने निर्णय घेतील. या दिवाणी खटल्याची संवेदनशीलता लक्षात घेऊन हा खटला दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग वाराणसी येथून जिल्हा न्यायाधीश वाराणसीकडे वर्ग करण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.