गुजरात: लग्नाच्या पहिल्या रात्री सेक्सला नकार दिल्याने नवऱ्याकडून बायकोला मारहाण
गुजरात (Gujrat) येथे लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोने सेक्स करण्यास नकार दिल्याने नवऱ्याकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
गुजरात (Gujrat) येथे लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोने सेक्स करण्यास नकार दिल्याने नवऱ्याकडून मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. तर नवऱ्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्रियंका तिवारी असे महिलेचे नाव आहे. तर लग्नसोहळ्याच्या सर्व विधी-समारंभामुळे थकवा वाटत असल्याने प्रियंका झोपली. मात्र नवरा धर्मेंद याने सेक्स करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी नकार दिल्याचे प्रियंकाने म्हटले आहे. त्यावरुन धर्मेंद्र याने शिवीगाळ करत बाहेर प्रेमप्रकरण असल्याचे सुनावले.(लग्नासाठी रजा नाकारल्याने पोलीस कर्मचा-याने वरिष्ठावर झाडल्या १३ गोळ्या)
तर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी प्रियंका हिला धर्मेंद्र याने मारहाण केली. तसेच घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत धर्मेंद्र याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.