वडोदरा: मुसळधार पावसामुळे मगरींची लोकवस्तीत धाव, कुत्र्यावर केला हल्ला (Watch Video)

गुजरात (Gujrat) मधील वडोदरा येथे मुसळधार पडलेल्या पावसामुळे मगरींनी लोकवस्तीत धाव घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

Gujarat Heavy Rain (Photo Credits-Twitter)

सध्या राज्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढला असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तर काही भागात पावसामुळे वीजपुरवठासुद्धा खंडीत करण्यात आला. परंतु गुजरात (Gujrat) मधील  वडोदरा येथे मुसळधार पडलेल्या पावसामुळे मगरींनी लोकवस्तीत धाव घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

पावसामुळे वडोदरा येथे पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यात आता मगरींची भर पडली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियात येथील परिस्थितीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायर होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत नागरिकांच्या वस्तीत चक्क मगरी घुसल्याचे दिसून आले. त्यावेळी पाण्यात अडकेल्या दोन कुत्र्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी नागरिक प्रयत्न करत होते. तितक्याच पाठून आलेल्या मगरीने कुत्र्यावर हल्ला केल्याचे व्हिडिओतून दिसून आले आहे.(दारुच्या नशेत सापाला चावला माणूस, कुटुंबीयांनी केले मेलेल्या सापावर अंत्यसंस्कार; उत्तर प्रदेश राज्यातील एटा जिल्ह्यात घडली विचित्र घटना)

या प्रकारामुळे नागरिक घाबरले आहेत. तसेच गुजरातमध्ये मुसधार पावसामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र नदीमधील मगरींचा असा मुक्तपणे वावर एखाद्याच्या जीवावर बेतण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.