गुजरात: दंडापोटी तब्बल 27.68 लाख रुपये भरुन सोडवली पोलिसांनी जप्त केलेली कार

पण त्याला त्यासाठी जबरदस्त दंड भरावा लागला असून त्याची किंमत जवळजवळ 27.28 लाख रुपये आहे. तुम्ही हे ऐकून थक्क झालात ना पण हे खरे आहे.

प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

गुजरात येथे एका वाहन चालकाची गाडी पोलिसांनी जप्त केली. पण त्याला त्यासाठी जबरदस्त दंड भरावा लागला असून त्याची किंमत जवळजवळ 27.28 लाख रुपये आहे. तुम्ही हे ऐकून थक्क झालात ना पण हे खरे आहे. चालकाकडून स्विकारण्यात आलेला हा दंड कारवरील थकीत दंडाची रक्कम आणि त्यावरील व्याजासह वसूल केली आहे. चालकाकडे कारची योग्य कागपत्रे नसल्याने जप्त केली होती. मात्र दंडाची एवढी रक्कम भरणे चालकाला चांगलेच महागात पडले आहे.

रणजीत देसाई असे कार मालकाचे नाव आहे. त्याच्याकडे आलिशान गाड्यांमधील पोर्श 911 ही कार असून ती पोलिसांनी जप्त केली होती. या मागे एवढेच कारण होते की कार मालकाकडे गाडीचे योग्य कागदपत्र नसल्याने ही कारवाई करण्यात आली होती. मात्र त्याचवेळी कारवरील अन्य दंडाची रक्कम सुद्धा पोलिसांनी वसूल करुन घेतली आहे. या दंडाच्या रक्कमेचा फोटो वाहतूक पोलिसांकडून सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला आहे.(मोटार वाहन कायद्यात बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही; नियम मोडल्यास लागू होणार राष्ट्रपती राजवट- केंद्र सरकार)

पहिल्यांदाच एखाद्या वाहन मालकाला लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देत असे म्हटले आहे की, कारला गाडी क्रमांकाची प्लेट नसल्याने जप्त करण्यात आली होती. तर 1 सप्टेंबर पासून वाहतूक नियमात बदल करण्यात आल्यानंतर वाहतूकीचे नियम मोडल्यास चालकांकडून जबरदस्त दंडाची रक्कम वसूल केली जात आहे. त्यामुळे वाहतूकीचे नियम पाळण्याचे आवाहन वारंवार व करण्यात येते.