Gujarat Shocker: चुलत भावाने गुदाशयात घातला उच्च दाबाचा कंप्रेसर पाईप; तरुणाचा मृत्यू, गुन्हा दाखल

प्रजासत्ताक दिन एकत्र साजरा करता यावा म्हणून प्रकाश हा त्याचे चुलत भाऊ अल्पेश आणि घेवाभाई यांना भेटण्यासाठी अहमदाबादहून मेहसाणा येथे आला होता. दोघे चुलत भाऊ मेटल कंपनीत कामाला होते, त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी प्रकाश कंपनीत गेला.

Death प्रतिकात्मक फोटो Photo Credit- X

कधी कधी गमतीने केली जाणारी चेष्टा इतकी भारी पडते की, त्यामुळे व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. असेच काहीसे गुजरातमध्ये (Gujarat) पाहायला मिळाले. मेहसाणामध्ये एका तरुणाच्या चुलत भावाने प्रँक करण्यासाठी त्याच्या गुदद्वारात कंप्रेसरची नळी (High-Pressure Compressor Pipe) घातली. त्यानंतर या मुलाचा मृत्यू झाला. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केली असून घटनेचा तपास सुरू आहे. हा अपघात विनोद म्हणून घडला की मुद्दाम घडवून आणण्यात आला, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

ही घटना कडी तालुक्यातील वडू गावात असलेल्या लायका हेवी मेटल नावाच्या कंपनीत घडली असल्याची माहिती पोलिसांकडून सायंकाळी मिळाली. प्रकाश असे मृताचे नाव आहे. अहवालानुसार, प्रजासत्ताक दिन एकत्र साजरा करता यावा म्हणून प्रकाश हा त्याचे चुलत भाऊ अल्पेश आणि घेवाभाई यांना भेटण्यासाठी अहमदाबादहून मेहसाणा येथे आला होता. दोघे चुलत भाऊ मेटल कंपनीत कामाला होते, त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी प्रकाश कंपनीत गेला.

तिथे कंपनीचे कर्मचारी एअर कॉम्प्रेसरने पेंट सुकवत होते. त्यावेळी अल्पेशने त्यांच्याकडून एअर कॉम्प्रेसर घेऊन मस्करी करत कॉम्प्रेसरच्या पाईपची रबरी नळी प्रकाशच्या गुदद्वारात घातली. यामुळे प्रकाशला उलट्या होऊ लागल्या आणि कॉम्प्रेसरच्या हवेमुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला तातडीने स्थानिक खासगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथून त्याला दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्याला अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (हेही वाचा: Air Compressor in Rectum: गुदाशयात एअर कँप्रेसर घातल्याने एकाचा मृत्यू, पुणे येथील हडपसर औद्यगिक वसाहतीतील घटना)

याबाबत अल्पेश वनकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कंपनीत काम करणाऱ्या घेवाभाईने पोलिसांना सांगितले की, अल्पेशला कॉम्प्रेसर पाईपमध्ये जास्त दाबाची हवा असल्याचे माहीत होते, तरीही त्याने हा प्रकार केला. ही घटना कधी आणि नेमकी कशी घडली याचा शोध घेण्यासाठी पोलीस कंपनीत बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने तपास करत आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now