Gujarat Riots 2002: देशभर गाजलेल्या Naroda Gam हत्याकांडातील सर्व आरोपी निर्दोष; मुस्लिम 11 नागरिकांची झाली होती हत्या

या प्रकरणात एकूण 86 आरोपींवर खटला सुरू होता. 86 आरोपींपैकी 18 आरोपींचा मधल्या काळात मृत्यू झाला. गुजरातमधील अहमदाबाद (Ahmedabad ) शहरातील नरोडा गाम भागात 28 फेब्रुवारी 2002 रोजी झालेल्या जातीय हिंसाचारात अकरा मुस्लिमांचा मृत्यू झाला होता.

Babu Bajrangi, Maya Kodnani | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

गुजरातच्या माजी मंत्री आणि भाजप नेत्या माया कोडनानी (Maya Kodnani) आणि बजरंग दलाचे (Bajrang Dal) नेते बाबू बजरंगी (Babu Bajrangi) यांच्यासह नरोदा गाम हत्याकांडातील (Naroda Gam Massacre Case) सर्व आरोपींना अहमदाबाद येथील विशेष न्यायालयाने गुरुवारी निर्दोष मुक्त केले. या प्रकरणात एकूण 86 आरोपींवर खटला सुरू होता. 86 आरोपींपैकी 18 आरोपींचा मधल्या काळात मृत्यू झाला. गुजरातमधील अहमदाबाद (Ahmedabad ) शहरातील नरोडा गाम भागात 28 फेब्रुवारी 2002 रोजी झालेल्या जातीय हिंसाचारात अकरा मुस्लिमांचा मृत्यू झाला होता. गोध्रा येथे ट्रेन जाळल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान ही घटना घडली होती. जाळलेल्या ट्रेनच्या डब्यात अयोध्येहून परतणारे 58 प्रवासी होते. यातील बहुतांश सर्वच जण कारसेवक होते. ज्याचा ट्रेनला लागलेल्या आगीत मृत्यू झाला.

विशेष सरकारी वकील सुरेश शहा यांनी सांगितले की, या प्रकरणात (नरोदा गाम) खटला 2010 मध्ये सुरू झाला. खटल्यादरम्यान फिर्यादी आणि बचाव पक्षाने अनुक्रमे 187 आणि 57 साक्षीदार तपासले. हा खटला साधारण 13 वर्षे सहा न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर चालला. (हेही वाचा, शीखविरोधातील दंगल प्रकरणातील दोषी सज्जन कुमार यांची शरणागती)

उल्लेखनीय असे की, भाजपचे ज्येष्ठ नेते (आताचे केंद्रीय गृहमंत्री) अमित शाह हे सप्टेंबर 2017 मध्ये या खटल्यातील आरोपी माया कोडनानी यांच्या बचावासाठी साक्षीदार म्हणून हजर झाले होते. नरोदा गाम हत्याकांडातील आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम 302 (हत्या), 307 (हत्येचा प्रयत्न), 143 (बेकायदेशीरपणे एकत्र येणे), 147 (दंगल), 148 (घातक शस्त्राने सशस्त्र दंगल), 120 (बी) (गुन्हेगारी कट) , आणि 153 (दंगलीसाठी चिथावणी देणे) कलमांन्वये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यांसाठी किमाल शिक्षा मृत्यूदंडाची आहे.

ट्विट

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील गुजरात सरकारमध्ये मंत्री असलेल्या कोडनानी यांना नरोडा पाटिया दंगल प्रकरणात दोषी ठरवून 28 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होत. ज्यात 97 लोकांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर गुजरात हायकोर्टाने त्यांना दिलासाही दिला होता.