Gujarat Horror: बळी देण्यासाठी जोडप्याने केला स्वतःचा शिरच्छेद; धारधार शस्त्राने डोके केले धडापासून वेगळे

या जोडप्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, दोघे गेल्या एक वर्षापासून रोज झोपडीत पूजा/अर्चना करत होते. घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी नातेवाईकांना आपले आई-वडील आणि मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Gujarat Horror: बळी देण्यासाठी जोडप्याने केला स्वतःचा शिरच्छेद; धारधार शस्त्राने डोके केले धडापासून वेगळे
Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

गुजरातमधील (Gujarat) राजकोटमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका पुरुषाने आणि त्याच्या पत्नीने स्वतःचा बळी देण्यासाठी गिलोटिनसारखे उपकरण वापरून आपले डोके धडापासून वेगळे केले. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, या जोडप्याने हे 'गिलोटिन' उपकरण घरीच बनवले होते, ज्याच्या सहाय्याने त्यांनी आत्महत्या केली. विंचिया पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक इंद्रजित सिंग जडेजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमुभाई मकवाना (38) आणि त्यांची पत्नी हंसाबेन (35) यांनी विंचिया गावातील त्यांच्या शेतातील झोपडीत हत्याराच्या ब्लेडने गळा कापून आत्महत्या केली.

पती-पत्नीने आत्महत्येचा हा बेत अशा प्रकारे आखला होता की, डोके कापल्यानंतर ते जवळच्या अग्निकुंडात जाऊन पडेल. घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. जडेजा म्हणाले की, या जोडप्याने दोरीने बांधलेल्या गिलोटिन सारख्या यंत्राखाली डोके ठेवण्यापूर्वी एक अग्निकुंड तयार केला होता. त्यांनी दोरी सोडताच त्यांच्या अंगावर लोखंडी ब्लेड पडून त्यांचा शिरच्छेद झाला व डोके अग्निकुंडात पडले. शनिवारी रात्री हा विधी पार पडला.

या जोडप्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, दोघे गेल्या एक वर्षापासून रोज झोपडीत पूजा/अर्चना करत होते. घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी नातेवाईकांना आपले आई-वडील आणि मुलांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (हेही वाचा: अतिक आणि अश्रफ यांच्यावर हल्ला करणाऱ्यांनाही धोका? तिन्ही मारेकऱ्यांना नैनी कारागृहातून प्रतापगडला हलवण्यात आलं)

दरम्यान, याआधी झारखंडच्या लोहरदगा जिल्ह्यात मुलाच्या हव्यासापोटी एका व्यक्तीचे चक्क आपल्या पोटच्या मुलीचा बळी दिल्याची घटना उघडकीस आली होती. आरोपी हा रोजीरोटीसाठी दुसऱ्या राज्यात गेले असताना एका भगतने त्याला पुत्रप्राप्तीसाठी आपल्या मुलीचा बळी देण्याचा सल्ला दिला होता.

(The above story first appeared on LatestLY on Apr 17, 2023 06:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).