Gujarat Election 2022: 'महिलांनी निवडणूक लढवणे हे इस्लामच्या विरोधात'; गुजरातमध्ये शाही इमामच्या वक्तव्याने नवा वाद (Watch)

या ठिकाणी एकही महिला नाही. इस्लाममध्ये प्रार्थनेला खूप महत्त्व आहे. जर इस्लाममध्ये महिलांना अशा प्रकारे लोकांसमोर येण्याची परवानगी असते, तर त्यांना मशिदीत येण्यापासून रोखले गेले नसते.'

Shabbir Ahmed Siddiqui (संग्रहित संपादित प्रतिमा)

गुजरातमध्ये (Gujarat Election 2022) उद्या म्हणजेच 5 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्ह्यांतील 93 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. त्याचवेळी अहमदाबादमधील जामा मशिदीचे शाही इमाम शब्बीर अहमद सिद्दीकी (Shabbir Ahmed Siddiqui) यांनी मतदानापूर्वी आपल्या वक्तव्याने वाद निर्माण केला आहे. शब्बीर अहमद सिद्दीकी यांनी निवडणुकीत महिलांना तिकीट देण्यास विरोध दर्शवला आहे. त्यांनी महिलांनी निवडणूक लढवणे ही इस्लामविरोधात असल्याचे सांगितले आहे.

अशाप्रकारे गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवा वाद निर्माण झाला आहे. अहमदाबाद येथील जामा मशिदीच्या शाही इमामाने मुस्लिम महिलांच्या राजकारणातील सहभागाचा निषेध केला आहे. मुस्लिम महिलांना निवडणुकीचे तिकीट देणे इस्लामच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले. यातून या महिला आपला धर्म कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी शाही इमाम शब्बीर अहमद सिद्दीकी यांनी, तिकीट देण्यासाठी पुरुष शिल्लक नाही का?, असा सवालही केला.

सिद्दीकी म्हणाले की, ‘सध्या लोक येथे नमाज अदा करत आहेत. या ठिकाणी एकही महिला नाही. इस्लाममध्ये प्रार्थनेला खूप महत्त्व आहे. जर इस्लाममध्ये महिलांना अशा प्रकारे लोकांसमोर येण्याची परवानगी असते, तर त्यांना मशिदीत येण्यापासून रोखले गेले नसते. महिलांना मशिदीत येण्यास रोखण्यात आले, कारण इस्लाममध्ये महिलांना एक स्थान आहे. म्हणूनच महिलांना तिकीट देणे म्हणजे इस्लामविरुद्ध बंड आहे.’ (हेही वाचा: ‘भारत जोडो यात्रा’ नंतर कॉंग्रेस सुरु करणार ‘हाथ से हाथ जोडो अभियान’; जाणून घ्या काय असेल खास)

याआधी गुजरातमधील मुस्लिम मतांबाबत बोलताना ते म्हणाले होते की, गुजरातमध्ये आणि राज्यातील मुस्लिम लोकांमध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाला वाव नाही. आम आदमी पक्षावर निशाणा साधत ते म्हणाले की, लोक आधीही आले, पण इथे टिकू शकले नाहीत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif