Gujarat Assembly Elections 2022: गुजरात मध्ये आज 89 मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील मतदान

आज सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर उमेदवार Rivaba Jadeja, मंत्री Purnesh Modi, Madhya Pradesh Governor Mangubhai Patel यांनी सपत्निक मतदानाचा हक्क बजावला आहे.

गुजरात निवडणूक । PC: Twitter/ANI

गुजरात विधानसभा निवडणूकीचा (Gujarat Assembly Elections) मतदानाचा आज पहिला टप्पा आहे. सौराष्ट्र-कच्छ प्रांत व दक्षिणेकडील 19 जिल्ह्यांतील 89 मतदारसंघांत मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणर आहेत. आज 788 उमेदवारांचं राजकीय भवितव्य कोट्यावधी मतदार मतपेटीमध्ये बंद करणार आहेत. सकाळी 8 ते संध्याकाळी 5 या वेळेत हे मतदान पार पडणार आहे. कॉंग्रेस, भाजपा, एमआयएम, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय ट्रायबल पार्टी सोबतच यंदा या निवडणूकीत आप देखील आपलं नशीब आजमवणार आहेत. अरविंद केजरीवाल स्वतः या निवडणूकीच्या रणधुमाळीत प्रचारासाठी उतरले होते. कॉंग्रेस कडून भारत जोडो यात्रा मध्ये काही दिवसांचा ब्रेक घेऊन राहुल गांधी यांनी देखील गुजरात मध्ये प्रचारसभांना संबोधित केले आहे.

गुजरातमध्ये मतदान दोन टप्प्यात होणार आहे. आज 89 जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यांत 5 डिसेंबर रोजी 93 जागांसाठी मतदान पडणार आहे. 8 डिसेंबरला या मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. नक्की वाचा: Gujarat Assembly Election 2022: 'नरेंद्र मोदी गया तो गुजरात गया’; Ravindra Jadeja ने शेअर केला बाळासाहेब ठाकरेंचा जुना व्हिडीओ (Watch Video) .

गुजरात मध्ये मतदान

2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळालं होतं. भाजपाला 99 जागांवर विजय मिळवला होता, तर काँग्रेसनं 80 जागांवर विजय मिळवला होता. गेली 25 वर्ष गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. आता ही सत्ता कायम राखण्याचं आव्हान भाजपा समोर आहे.

आज सकाळी मतदान सुरू झाल्यानंतर उमेदवार Rivaba Jadeja, मंत्री Purnesh Modi, Madhya Pradesh Governor Mangubhai Patel यांनी सपत्निक मतदानाचा हक्क बजावला आहे.