GST Rates Revised: जीएसटी दरात बदल, हॉटेल, खाणे-पिणे, चाकूंसह अनेक दराद बदल; घ्या जाणून, काय महाग काय स्वस्त?

या बैठकीत अनेक वस्तुंवरील वस्तू सेवा कर दरात बदल (GST Rates Revised) करण्यात आला. त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशावरील भार आणखी वाढला आहे.

Nirmala Sitharaman | (Photo Credits- Twitter)

चंडीगढ येथे झालेल्या जीएसटी परिषदेची (GST Council) 47 वी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अनेक वस्तुंवरील वस्तू सेवा कर दरात बदल (GST Rates Revised) करण्यात आला. त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशावरील भार आणखी वाढला आहे. जीएसटी परिषदेने फूड आयटम्स म्हणजेच खाद्यपदार्थांची पॅकींगवरही जीएसटी (GST Rates) लावणयाचा निर्णय घेतला आहे. अन्नपदार्थ आणि अनपॅक आयटम्सवरही आता त्याच दराप्रमाणे कर द्यावा लागणार आहे. जितका सामानावर लागतो. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जार जीओएमने आपल्या शिफारसीही सादर केल्या.

महसूल सचिव तरुण बजाज यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, जीएसटी काऊन्सीलने सुचवलेले बदल हे 18 जुलैपासून लागू होतील. (हेही वाचा, Fraud: जीएसटी अधिकारी असल्याचे दाखवून लोकांची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक)

कोणकोणते पदार्थ, वस्तूं झाल्या महाग?

पॅकेज फूड: जीएसटी परिषदेने पॅकेज फूडही जीएसटी कक्षेत आणले आहेत. यात अन्नपपदार्थ, प्री लेबल्ड रिटेल पॅक, टॅक्स, लस्सी, लोणी यांसारखे दूग्धजन्य पदार्थ महागले आहेत.

बँक चेक बुक- बँक व्यवहारांमध्ये महत्त्वाचे मानले जाणारे लूज चेक किंवा चेक बुक हेसुदधा जीएसटी कक्षेत आले आहेत. त्यावर 18% जीएसटी लागणार आहे.

हॉटेल रुम: ज्या हॉटेलचे प्रतिदिन भाडे 1000 रुपयांपेक्षाही कमी आहे. त्यांवर 12% जीएसटी लागणार आहे. आतापर्यंत 1000 रुपयांपेक्षा कमी भाडे असलेल्या हॉटेल्सना करसवलत होती.

हॉस्पिटल बेड- रुग्णालयात रुग्णांना प्रति दिन 5,0000 पेक्षा अधिक रुमभाडे (आयसीयू वगळून) असणाऱ्या खोल्यांना 5% जीएसटी लागणार आहे.

एलईडी लाईट्स, दिवे- एलईडी लाईट्स, फिक्चर एलईडी लँप याच्याही किंमती वाढल्या आहेत. या सर्वांवर 12% जीएसटी लागणार आहे

चाकू- ब्लेड्स, चाकू, पेपर कटर, पेन्सील शार्पनर यांसारख्या आणि त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ब्लेड, चमचे, फोर्क्स, लँडल्स, स्किमर्स, केक सर्वर आदींना 12% एैवजी 18% स्लॅबमध्ये आणले गेले आहे.

पंप्स- सेंट्रीफ्यूगल पम्प आणि डीप ट्यूब वेल टरबाइन पम्प, सबमर्सिबल पम्प, बायसकिल पम्प यांसारख्या पाणी उपसा करणाऱ्या आणि विद्यूत उपकरणांमध्ये मोडणाऱ्या पंम्पलाही 12% वरुन 18% स्लॅबमध्ये आणण्यात आले आहे. याशिवाय क्लीनिंग, सॉर्टिंग, ग्रेडिंग यांसाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रावरील जीएसटीही वाढविण्यात आला आहे.

दरम्यान, रोपवे राईड्स, गुड कॅरेज रेंट आणि ऑर्थोपेडीक अप्लायंसेज यांच्यावरही मोठ्या प्रमाणावर जीएसटी वाढविण्यात आला आहे. ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावरचा भार चांगलाच वाढणार आहे.