IPL Auction 2025 Live

GST on Softy Ice-Cream: व्हॅनिला फ्लेवर्ड सॉफ्टी आइस्क्रीमवर भरावा लागेल 18 टक्के जीएसटी; साखरेच्या मोठ्या प्रमाणामुळे दुग्धजन्य पदार्थ म्हणता येणार नाही- AAR

ॲथॉरिटी ऑफ ॲडव्हान्स रुलिंगने निरीक्षण केले की, मऊ आणि मलईदार उत्पादन तयार करण्यासाठी प्रत्येक कच्च्या मालाची विशिष्ट भूमिका असते.

GST PTI

GST on Softy Ice-Cream: व्हॅनिला फ्लेवरमध्ये तयार केलेल्या सॉफ्टी आइस्क्रीमवर (Softy Ice-Cream) 18  टक्के जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) भरावा लागेल. ॲथॉरिटी ऑफ ॲडव्हान्स रुलिंगच्या राजस्थान खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. खंडपीठाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, व्हॅनिला फ्लेवरमध्ये तयार केलेले सॉफ्ट आइस्क्रीम हे दुग्धजन्य पदार्थ नाही, त्यामुळे त्यावर 18 टक्के जीएसटी भरावा लागेल. पीटीआयच्या मते, व्हीआरबी कंझ्युमर प्रॉडक्ट्स प्रा. (VRB Consumer Products Pvt Ltd) ने पावडरच्या स्वरूपात व्हॅनिला मिश्रणावरील जीएसटीबाबत ॲथॉरिटी ऑफ ॲडव्हान्स रुलिंगच्या राजस्थान खंडपीठाकडे संपर्क साधला होता.

सॉफ्टी आइस्क्रीममध्ये 61.2 टक्के साखर, 34 टक्के मिल्क सॉलिड्स (स्किम्ड मिल्क पावडर) आणि 4.8 टक्के इतर चव वाढवणारे पदार्थ आणि मीठ अशा गोष्टी समाविष्ट आहेत. ॲथॉरिटी ऑफ ॲडव्हान्स रुलिंगने निरीक्षण केले की, मऊ आणि मलईदार उत्पादन तयार करण्यासाठी प्रत्येक कच्च्या मालाची विशिष्ट भूमिका असते. शिवाय, हे देखील महत्त्वाचे आहे की केवळ उत्पादनातील घटकच नव्हे तर, आईस्क्रीम बनवण्याच्या मशीनमध्ये केलेली प्रक्रिया देखील सॉफ्ट सर्व्हला एक गुळगुळीत आणि क्रीमयुक्त पोत देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

जीएसटी कायद्यानुसार सार्वजनिक वापरासाठी फूड प्रोसेसिंगमध्ये बनवलेल्या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी आकारला जातो. याशिवाय दूध पावडर, साखर आणि इतर कोणतेही अतिरिक्त साहित्य वापरून तयार केलेले पदार्थ, जसे की, जेली, आईस्क्रीम आणि तत्सम गोष्टींवरही  18 टक्के जीएसटीची तरतूद आहे. ॲथॉरिटी ऑफ ॲडव्हान्स रुलिंगने म्हटले आहे की, ज्या उत्पादनावर प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याला डेअरी उत्पादन म्हणता येणार नाही. कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर वापरली आहे. अशा परिस्थितीत व्हॅनिला मिक्स फ्लेवरच्या ड्राय सॉफ्टी आइस्क्रीमवर 18 टक्के जीएसटी भरावा लागेल. (हेही वाचा: Shocking: पाणीपुरी बनवण्याचे पीठ पायाने मळून तयार केले; चव वाढवण्यासाठी टॉयलेट क्लीनर हार्पिक आणि युरियाचा वापर, दुकानदारांना अटक)

एएमआरजी अँड असोसिएट्सचे वरिष्ठ भागीदार रजत मोहन यांच्या मते, निकालात असे नमूद केले आहे की, या उत्पादनाचा मुख्य कच्चा माल साखर आहे आणि दुधाचे घन पदार्थ नाही. यामुळे ते दुग्धजन्य पदार्थाऐवजी प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ बनते. ते म्हणाले, हा निर्णय एखाद्या पदार्थाचे जीसीटीअंतर्गत वर्गीकरण करताना प्रमुख घटक आणि उत्पादन प्रक्रियांचे महत्त्व अधोरेखित करतो.