Sharad Pawar: शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी, 6 महिन्यात सरकार कोसळेल, मध्यवर्ती निवडणूकीला तयार राहा - शरद पवार

मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना समोर येईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. सरकार पडल तर मध्यावधी निवडणुका लागतील त्यामुळें तयारी आत्तापासून करा, असे पवार म्हणाले.

Sharad Pawar | (Photo Credits: ANI)

शिंदे सरकार (Shinde Govt) आता राज्याचा कारभार पाहणार आहे. त्याचवेळी सोमवारी विधानसभेत बहुमत चाचणी होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. पवार म्हणाले, राज्यातील शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. हे सरकार पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकीसाठी तयार राहा. आपण विरोधी बाकावर बसणार असलो तरी मतदार संघात जास्तीत जास्त वेळ द्या. शिंदे सरकारमध्ये नाराजांची फौज मोठी आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ही नाराजी उघड होताना समोर येईल. त्यामुळे बंडखोर आमदार स्वगृही परतण्याची शक्यता आहे. सरकार पडल तर मध्यावधी निवडणुका लागतील त्यामुळें तयारी आत्तापासून करा, असे पवार म्हणाले.

राष्ट्रवादीच्या आमदारांची शरद पवार यांच्यासोबतची बैठक संपली. आमदारांकडून बैठकीत विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांच्या नावाचा प्रस्ताव देण्यात आलाय. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी अजित पवार यांच्या नावाची घोषणा होऊ शकते. (हे देखील वाचा: Assembly Speaker Election: हे सरकार शिवसेना आणि भाजपचे सरकार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वक्तव्य)

नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिठाई खाऊ घालताना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या छायाचित्रांवर शरद पवार यांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले की, राज्यपालांच्या लोकप्रतिनिधींच्या वागण्यात गुणात्मक बदल दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा मी दूरचित्रवाणीवर पाहिला. राज्यपाल एकनाथ शिंदे यांना पेढा खाऊ घालत होते आणि पुष्पगुच्छ देत होते. राज्यपालांमध्ये काही गुणात्मक बदल झाल्याचे दिसते आहे.