सामान्यांना महागाई पासून तात्पुरता दिलासा; फेब्रुवारी महिन्यात दर 2.26% वर

दरम्यान फेब्रुवारी महिन्यातील महागाई दर 2.26% असून जानेवारी महिन्यातील हा दर 3.1% इतका होता. दरम्यान रिटेल इन्फेलशन असल्याने फेब्रुवारी महिन्यात तो देखील मागील दोन महिन्यांच्या तुलनेत निच्चांकावर आहे.

Foodgrains (Photo Credits: File Photo)

केंद्र सरकारमधील नरेंद्र मोदींच्या सरकारसाठी एक दिलासादायक बाब आहे. भारताचा फेब्रुवारी महिन्यातील महागाई दर मागील महिन्याच्या तुलनेत खाली उतरला आहे. दरम्यान फेब्रुवारी महिन्यातील महागाई दर 2.26% असून जानेवारी महिन्यातील हा दर 3.1% इतका होता. दरम्यान रिटेल इन्फेलशन असल्याने फेब्रुवारी महिन्यात तो देखील मागील दोन महिन्यांच्या तुलनेत निच्चांकावर आहे. सरकारी माहितीनुसार, भाज्या, स्वयंपाकघरातील वस्तू आणि अन्य अत्यावश्यक सामानांची किंमत कमी झाल्याने ही घट झाली आहे. Retail Inflation फेब्रुवारी महिन्यात 6.58% इतका नोंदवण्यात आला आहे. हाच जानेवारी महिन्यात 7.59% इतका नोंदवण्यात आला आहे. तर मागील वर्षी म्हणजे फेब्रुवारी 2019 मध्ये हा 2.57% इतका होता.

ANI Tweet

सध्या आरबीआयकडून मिडियम टर्म गोल नुसार Retail Inflation हा 4% राखण्याचा प्रयत्न सुरू आहे. Ministry of Commerce and Industry

कडून महागाई दराबाबत माहिती दिली जाते. आज नुकतीच फेब्रुवारी 2020 महिन्याबाबतची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार वर्ष 2020 च्या दुसर्‍या महिन्यात महागाईचा दर ओसरताना दिसत असल्याने ही दिलासादायक बाब आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now