Government Jobs 2023: पंतप्रधान नरेंद्र मदी यांच्या हस्ते 51 हजार युवकांना मिळणार नोकरीचे नियुक्तीपत्र; देशभरात 45 ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन
पंतप्रधान आठव्या रोजगार मेळाव्याचा शुभारंभ करतील. देशातील 45 ठिकाणी व्हर्च्युअल प्रणालीद्वारे पार पडणाऱ्या या मेळाव्यात पंतप्रधान भाषण देतील.
Rozgar Mela 2023: सरकारी सेवेमध्ये नव्याने भरती झालेल्या 51,000 हून अधिक उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी नियुक्ती पत्रांचे वाटप सोमवारी (28 ऑगस्ट) करणार आहेत. पंतप्रधान आठव्या रोजगार मेळाव्याचा शुभारंभ करतील. देशातील 45 ठिकाणी व्हर्च्युअल प्रणालीद्वारे पार पडणाऱ्या या मेळाव्यात पंतप्रधान भाषण देतील. भरती मोहीमेंतर्गत भारत सरकार आणि काही राज्ये/केंद्रशासित प्रदेश देशभरात रोजगार मेळावे आयोजित करत आहेत आणि दर महिन्याला लाखो तरुणांना नियुक्ती पत्रे वितरित करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आठव्या रोजगार मेळाव्यात हा कार्यक्रम देशभरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
या रोजगार मेळ्यामध्ये केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल (CRPF), सीमा सुरक्षा दल (BSF), सशस्त्र सीमा दल (SSB), असम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, (CISF), भारत तबेड सीमा पोलीस (ITBP) आणि नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NBC) सोबतच दिल्ली पोलीस दलातही कर्मचाऱ्यांची भर्ती केली जात आहे. त्याचे सरकारी नोकरी नियुक्तपत्र वाटप केले जाणार आहे.
ट्विट
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, देशभरातून निवडलेले नवीन भरती गृह मंत्रालयाच्या अंतर्गत विविध संस्थांमध्ये कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी), सब-इन्स्पेक्टर (GD) आणि नॉन-GD कॅडर पोस्ट अशा विविध पदांवर रुजू होणार आहेत. रोजगार मेळा हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने एक पाऊल असल्याचे सरकारने म्हटले आहे.