Gold Rate Today: सोन्याचे भाव घसरले, चांदी झाली महाग; जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर

तरी सोन्याचा भाव 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे.

Gold Jewelery | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

सोन्याच्या दरातील (Gold Rate) तेजी आजही कायम आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर बुधवारी सोन्याने 61,300 प्रति 10 ग्रॅमची सर्वोच्च पातळी गाठल्यानंतर त्याचा परिणाम सराफा बाजारातही दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने 13 महिन्यांचा उच्चांक गाठला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर 12 महिन्यांच्या उच्चांकावर आहेत, तर एमसीएक्सवर तो 22 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.

भारतीय सराफा बाजारात आज, 06 एप्रिल 2023 रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण झाली, तर चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. तरी सोन्याचा भाव 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचवेळी, चांदीचा भाव प्रतिकिलो 73 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 60575 रुपये आहे. तर 999 शुद्धतेची चांदी 73965 रुपये आहे.

गोल्ड रिटर्न्सनुसार, आज मुंबईमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 60,980 रुपये आहे. काल हा दर 61,360 रुपये होता. चेन्नईमध्ये आजचा सोन्याचा दर 60,640 रुपये आहे. दिल्लीमध्ये 61,130, बंगळूरूमध्ये 61,030 तर पुण्यात, 60,980 रुपये आहे.

बँकिंग संकट, मंदीची भीती, शेअर बाजारातील अस्थिरता, अमेरिकन डॉलरची घसरण, महागाई आणि भू-राजकीय तणाव यामुळे सोन्याच्या किमती वाढत आहेत. सोन्याच्या गुंतवणुकदारांसाठी काय धोरण असावे असे विचारले असता, मुंबईच्या जोहरी बाजार येथे सोन्याच्या घाऊक विक्रीचा व्यवसाय करणारे मयंक दासगुप्ता म्हणतात की, सध्या सोन्यात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सोन्याचा भाव 50,000 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. म्हणजेच सोन्याने 6 महिन्यांत 20% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. (हेही वाचा: Chennai: इलेक्ट्रिक मोटरमध्ये लपवून ठेवलेले 95.15 लाख रुपये किमतीचे सोने, चेन्नई विमानतळ कस्टम्सने केली कारवाई)

दरम्यान, सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (Indian Standard Organization)द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 असे लिहिले असते. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नसते आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके सोने जास्त शुद्ध समजले जाते.