Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ; मुंबई, दिल्ली, कोलकाता सहित देशातील प्रमुख शहरात हे आहेत भाव

कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबई मध्ये आज सोन्याचे प्रति 10 ग्राम सोन्याचे दर 41 हजार 656 रुपये इतके झाले आहेत तर दिल्ली (Delhi), कोलकाता (Kolkata), हैदराबाद (Hyderabad), चेन्नई (Chennai) सहित देशभरातील मुख्य शहरात सुद्धा सोन्याचे भाव वाढलेले दिसून येत आहेत

Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ; मुंबई, दिल्ली, कोलकाता सहित देशातील प्रमुख शहरात हे आहेत भाव
Gold | Representational Image | (Photo Credits: PTI)

मागील काही काळात सोन्याच्या भावात (Gold Rate) सतत चढ उतार होत आहेत, काही तज्ज्ञांच्या मते हा कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संकटकाळ दूर झाल्यावर तर सोन्याच्या किमती 50 हजाराच्या पार जाण्याची शक्यता वर्तवली आहे. या भाववाढीची मागील दोन दिवसांपासून सुरवात झालेली दिसून येतेय, कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मुंबई मध्ये आज सोन्याचे प्रति 10 ग्राम सोन्याचे दर 41 हजार 656 रुपये इतके झाले आहेत तर दिल्ली (Delhi), कोलकाता (Kolkata), हैदराबाद (Hyderabad), चेन्नई (Chennai) सहित देशभरातील मुख्य शहरात सुद्धा सोन्याचे भाव वाढलेले दिसून येत आहेत. देशभरात चांदीच्या किमतीत मात्र घसरण झाली आहे, आजचे प्रति किलो चांदीचे दर हे 39,574 रुपये आहेत. कोरोना मुळे जागतिक बाजारात आलेली मंदी पाहता सुरक्षित पर्याय म्हणून अनेकजण सोन्यात गुंतवणूक करण्याला पसंती दर्शवत आहेत, तुम्हीही असा विचार करत असाल तर आजचे मुंबई, दिल्ली, कोलाकाता सहित देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर जाणून घ्या..

देशातील प्रमुख शहरातील सोने दर

शहर         24 कॅरेट सोने 10 ग्राम          22 कॅरेट सोने 10 ग्राम

मुंबई                41,656                                    39,666

दिल्ली              42,559                                   40,537

कोलकाता        42,705                                 40,655

चेन्नई                  41,573                                  39,590

हैदराबाद            41,522                                 39,556

(टीप- वरील दर हे Goldpriceindia.com या वेबसाईट वर प्राप्त हिताच्या आधारे देण्यात आल्या आहेत.)

गॅस सिलिंडर झाला स्वस्त ; जाणून घ्या नवी किंमत : Watch Video

दरम्यान, तज्ञांच्या अंदाजानुसार लॉक डाऊन संपताच लगेचच असणाऱ्या अक्षय्य तृतीया सणाच्या निमित्तानं पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.लवकरच सोन्याची किंमत 50,000 रुपयांच्या वर जाऊन प्रति 10 ग्रॅम 52 हजार इतक्या दरात सोने विकले जाऊ शकते.

(The above story first appeared on LatestLY on Apr 01, 2020 03:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).