Gold Rate On Diwali Laxmi Pujan Today: लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आज सोनं-चांदीचा दर काय?

सोने दागिने कॅरेट अनुसार हॉल मार्कचे बनवले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिण्यांवर 999 असा शिक्का असतो. 23 कॅरेट दागिन्यावर 958, 22 कॅरेट दागिन्यावर 916, 21 कॅरेट वर 875 आणि 18 कॅरेट वर 750 लिहीलेले असते.

Jewellery | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

दिवाळी मध्ये आज लक्ष्मीपूजनाचा (Laxmi Pujan) दिवस आहे. दीपोत्सवाच्या 5-6 दिवसामध्ये शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी केली जाते. आज लक्ष्मी पूजनाला घरातील धनसंपत्तीचं पूजन केले जाते. या निमित्ताने नवी सोनं किंवा चांदीची वस्तू देखील खरेदी केली जाते. सराफा दुकानात या निमित्ताने मोठी गर्दी उसळते. येता सणासुदीचा आणि लग्न सराईचा काळ पाहता सोनं खरेदी  केली जाते.  goodreturns.in वेबसाईट नुसार आज भारतामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,600 आहे. कालच्या तुलनेमध्ये 490 रूपये सोनं कमी झालं आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 55,550 आहे. कालच्या तुलनेमध्ये 450 रूपये सोनं कमी झालं आहे.  तर प्रति किलो चांदीची किंमत 73 हजार रूपये आहे. कालच्या तुलनेत चांदी हजार रूपये कमी झाली आहे.  नक्की वाचा: Lakshmi Pujan 2023 Wishes: लक्ष्मी पूजनानिमित्त WhatsApp Status, SMS, HD Greetings, Quotes द्वारा द्या मंगलमय शुभेच्छा! 

मुंबई, पुणे नाशिक, नागपूर मध्ये सोन्या, चांंदीचा आजचा दर काय? 

मुंबई, पुणे, नागपूर मध्ये आज 24 कॅरेट सोनं 60,590 आहे, 22 कॅरेट सोनं 55,540 आहे तर 18 कॅरेट सोनं 45,440 रूपये आहे. नाशिक मध्ये 24 कॅरेट सोनं 60,620 आहे, 22 कॅरेट सोनं 55,570 आहे तर 18 कॅरेट सोनं 45,470 रूपये आहे. तर चांदीचा दर मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक मध्ये 73000 आहे.

दागिन्यांची शुद्धता तपासण्यासाठी BIS CARE APP द्वारे तपासू शकता. इंडियन बुलियन अ‍ॅन्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. दागिने बनविण्यासाठी प्रामुख्याने 22 कॅरेट सोन्याचाच वापर होतो. यात काही लोक 18 कॅरेट सोन्याचाही उपयोग करतात.  डायमंडचे दागिने 18 कॅरेट मध्ये केले जातात. सोने दागिने कॅरेट अनुसार हॉल मार्कचे बनवले जातात. 24 कॅरेट सोन्याच्या दागिण्यांवर 999 असा शिक्का असतो. 23 कॅरेट दागिन्यावर 958, 22 कॅरेट दागिन्यावर 916, 21 कॅरेट वर 875 आणि 18 कॅरेट वर 750 लिहीलेले असते. फसवणूक टाळण्यासाठी सोनं खरेदी करताना हॉलमार्क पाहून आणि त्याची पावती घेऊन व्यवहार पूर्ण करा.

 

 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now