Gold Rate on 26th October: दस-याच्या दुस-या दिवशी सोन्याच्या किंमतीत घट, जाणून घ्या मुंबईसह महत्त्वाच्या शहरांतील आजचे दर
पाहूयात मुंबई, पुणे, नवी दिल्लीसह अन्य शहरांतील सोन्याचे दर
दस-याच्या (Dussehra) निमित्ताने सोने खरेदी करणा-या ग्राहकांनी यंदाही सोने खरेदीवर अपेक्षेप्रमाणे गर्दी केली. काही ठिकाणी सोन्याच्या दुकानात तुडूंब गर्दी पाहायला मिळाली तर काही ठिकाणी सोने खरेदीला संमिश्र परिणाम पाहायला मिळाला. मात्र दस-याच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदी करण्याची पूर्वापार चालत आलेली प्रथा यंदाही कायम ठेवली. दस-याच्या दिवशी सोन्याला चांगलीच झळाळी आली होती. त्यामुळे कालचे सोन्याचे दर (Gold Rate) हे मुंबईत प्रतितोळा 51,200 रुपये होते. मात्र आज म्हणजेच दस-याच्या दुस-याच्या दरात काहीशी घट झालेली पाहायला मिळत आहे.
आज मुंबईत 24 कॅरेट (24 Carat) सोन्याचा भाव प्रतितोळा 51,050 रुपये इतका असून 22 कॅरेट सोन्याचा दर (22 Carat) 50,050 रुपये इतका आहे. तर देशातील काही महत्त्वाच्या शहरांत सोन्याचा भाव स्थिर असून कालचाच दर कायम आहे. Gold Rate on Dussehra 2020: दस-याच्या मुहूर्तावर सोन्याला आली झळाळी, जाणून घ्या आजचे दर
पाहूयात मुंबई, पुणे, नवी दिल्लीसह अन्य शहरांतील सोन्याचे दर
| शहर | 24 कॅरेट/प्रतितोळा | 22 कॅरेट/प्रतितोळा |
| मुंबई | 51,050 रुपये | 50,050 रुपये |
| पुणे | 51,050 रुपये | 50,050 रुपये |
| चेन्नई | 51,510 रुपये | 47,220 रुपये |
| हैदराबाद | 51,510 रुपये | 47,220 रुपये |
| नवी दिल्ली | 52,890 रुपये | 49,400 रुपये |
| बंगळूरू | 51,710 रुपये | 50,110 रुपये |
| नागपूर | 51,050 रुपये | 50,050 रुपये |
| चंदिगड़ | 52,350 रुपये | 48,800 रुपये |
यंदा कोरोना व्हायरसमुळे सर्व सणांचा उत्साह म्हणावा तसा पाहायला मिळाला नाही. सण म्हटले की लोक एकत्र येतात आणि एकत्रित येऊन आनंदाने सण साजरे करतात. मात्र यंदा सोशल डिस्टंसिंगच्या नियमांमुळे आपल्याला तसे करता आले नाही. पण आता हा देशातील महत्त्वाच्या सणांचा मोसम सुरु होत असल्याने तो उत्साह हळूहळू पाहायला मिळत आहे. त्याची प्रचिती काल दस-याच्या मुहूर्तावर झालेल्या सोने खरेदीवर दिसून आली.
(The above story first appeared on LatestLY on Oct 26, 2020 08:42 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

