Buying Gold on Deepavali: दिवाळी अथवा इतर वेळी BIS-नोंदणीकृत ज्वेलर्सकडून केवळ हॉलमार्क दागिनेच खरेदी करा; सरकारचा आग्रह

भारतात 23 जून 2021 पासून हॉलमार्किंगचे दागिणे बनविणे आणि हॉलमार्क असलेले दागिणेच विक्रीस ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Gold Jewelery | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

धनत्रयोदशी (Dhanteras) आणि दिवाळी (Diwali) सणांच्या शुभ मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी (Gold Purches) करु इच्छिणाऱ्या ग्राहकांना सरकारने हॉलमार्क (Hallmark ) असलेले दागिने खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सरकारच्या भारतीय मानक ब्युरो (BIS) आणि ग्राहक व्यवहार विभागाने लोकांना अवानह केले आहे की, 'नागरिकांनी केवळ BIS-नोंदणीकृत ज्वेलर्सकडून (BIS-registered jewelers) हॉलमार्क केलेले सोन्याचे दागिने/चांदीच्या दागिन्यांच्या कलाकृती खरेदी कराव्यात', असे अवाहन केले. बीआयएसने याबाबत अधिकृत निवेदन दिले आहे.

बीआयएसने दिलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, हॉलमार्क उघड्या डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत नसल्यास, ज्वेलर्सकडून भिंग मागवा, असा सल्ला दिला आहे. भारतात 23 जून 2021 पासून हॉलमार्किंगचे दागिणे बनविणे आणि हॉलमार्क असलेले दागिणेच विक्रीस ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. देशातील जवळपास 256 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे. सरकारी नियमानुसार 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग असणे बंधनकारक आहे. देशभरातील सुमारे 256 जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी किमान एक तरी हॉलमार्किंग आणि सोनेशुद्धता पारखण्याचे केंद्र आहे. (हेही वाचा, Petrol and Diesel Prices in India: सलग 7 दिवस इंधन दरवाढी नंतर आज पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर)

हॉलमार्क केलेले दागिने फक्त BIS-नोंदणीकृत ज्वेलर्स विकू शकतात. दरम्यान सोने खरेदीनंतर ग्राहकांनी खरेदी केलेल्या दागिन्यांच्या बिलासाठी आग्रह धरण्याचे आवाहनही सरकारने केले आहे.

"हॉलमार्क केलेल्या दागिन्यांच्या विक्रीचे बिल किंवा इनव्हॉइस प्रत्येक वस्तूचे स्वतंत्रपणे वर्णन, मौल्यवान धातूचे निव्वळ वजन, कॅरेटमधील शुद्धता आणि सूक्ष्मता आणि हॉलमार्किंग शुल्क सूचित करेल," असे निवेदनात म्हटले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif