आज सोन्याचे भाव घसरले, जाणून घ्या सराफ बाजारातील किंमती

तर चांदीचे भाव वाढले आहेत.

सोन्याचा भाव Photo Credits Pixabay

सोन्याच्या भावात मंगळवारी (12 मार्च) घसरण झाली आहे. तर चांदीचे भाव वाढले आहेत. दिल्ली सराफ बाजारात सोन्याचे भाव 100 रुपयांनी कमी झाले असून 33150 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. तसेच स्थानिक ज्वेलर्स यांच्याकडून याबद्दल कमी प्रमाणात मागणी झाल्याने किंमती कमी झाल्या आहेत.

तर चांदीचे भाव वाढले असून 50 रुपयांनी महाग झाले असून 39580 रुपये प्रति किलो झाले आहे. चांदीमध्ये इंडस्ट्रियल युनिट आणि नाणे निर्मात्यांनी याची मागणी केल्याने त्याचे भाव वाढले आहेत. ट्रेडर्सच्यानुसार, स्थानिक ज्वेलर्सकडून सोने जास्त खरेदी केले नसल्याने किंमती कमी झाल्या आहेत. शेअर मार्केटमधील गिरावटीमुळे सोन्याच्या भावावर ही परिणाम दिसून आला.(हेही वाचा-सोने, चांदी दर घसरले, जागतिक बाजारातील चढउताराचा स्थानिक दरावर परिणाम)

न्यूयॉर्क येथे सोन्याचे दर 1,296.80 डॉलर्स प्रति औंस आहे. तर चांदीचे दर वाढले असून 15.49 डॉलर प्रति औंस झाले आहे. दिल्ली सराफ बाजारात 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्ध सोने क्रमश: 100-100 रुपयांनी कमी झाले असून 33,150 रुपये आणि 32,980 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif