कोरोनामुक्त झालेले गोवा राज्य आता Green Zone मध्ये, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार कोरोनाच्या विरोधात लढायचे असल्यास घरातच थांबावे असे आवाहन करण्यात आले आहे. याच दरम्यान काही दिवसांपूर्वी गोवा (Goa) राज्याने कोरोनाच्या विरोधात यशस्वी लढा दिल्याने ते कोरोनामुक्त झाले आहे.
देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार कोरोनाच्या विरोधात लढायचे असल्यास घरातच थांबावे असे आवाहन करण्यात आले आहे. याच दरम्यान काही दिवसांपूर्वी गोवा (Goa) राज्याने कोरोनाच्या विरोधात यशस्वी लढा दिल्याने ते कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी वैद्यकिय कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी देशभरात लॉकडाउन 3 मे पर्यंत कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहेत. यानंतर आता गोवा हे ग्रीन झोन मध्ये दाखल झाल्याची ही माहिती प्रमोद सावंत यांनी आज दिली आहे. एएनआय यांनी याबाबत अधिक माहिती देत ग्रीन झोनमधील अन्य जिल्हे आणि राज्यांची यादी सुद्धा त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून जाहीर केली आहे.
गोवा कोरोनामुक्त झाले असले तरीही या ठिकाणी ब्युटीपार्लर, मसाज सेंटर, वॉटरपार्क, रिसॉर्ट्स, सिनेमागृहासह अन्य ठिकाणे सुद्धा बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. तसेच गोव्यात मोठ्या प्रमाणात मत्स विक्री होत असल्याने तेथील मासे विक्री करणाऱ्या नागरिकांसाठी सुद्धा नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार मत्स विक्रेत्यांना सोशल डिन्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करावे असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.(भारतातील COVID-19 Hotspots नुसार राज्यातील जिल्हे आणि शहरांची रेड, ग्रीन, ऑरेंज झोनमध्ये विभागणी; येथे पाहा संपूर्ण यादी)
With the efforts of our Corona warriors and support of the people of Goa, our state has now been classified as a green zone by the Govt of India: Goa Chief Minister Dr. Pramod Sawant. #COVID19 pic.twitter.com/OVtCXCKKiU
— ANI (@ANI) May 1, 2020
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 8 हजारांच्या पार गेला आहे. तर देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा 35043 वर तर 1147 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी सद्यची परिस्थिती पाहता लॉकडाउनच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे अत्यावश्यक आहे. त्याचसोबत येत्या 3 मे नंतर लॉकडाउन संदर्भातील निर्णय सरकारकडून घोषित केला जाणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 01, 2020 01:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

