गोवा राज्य कोरोनामुक्त झाल्यामुळे स्थानिक पर्यटनाला सुरुवात मात्र परदेशी पर्यटनाला थोडा उशीर लागेल- राज्यपाल सत्यपाल मलिक

मात्र परदेशी पर्यटनास थोडा वेळ लागेल. पण तेही लवकरच सुरु करणयाचा प्रयत्न करु". सध्याची स्थिती जास्त काळ राहणार नाही असेही ते म्हणाले.

Goa tourism. (Photo Credit: Facebook)

देशात 31 मे पर्यंत लॉकडाऊन ठेवण्यात आला असून हा लॉकडाऊनचा 4.0 टप्पा आहे. त्यामुळे देशातील अर्थव्यवस्था लक्षात घेता नवीन नियमावलीनुसार हळूहळू दळणवळणाच्या गोष्टी सुरु करण्याता आल्या आहेत. त्यात एसटी सेवा सुरु करण्यात आली आहे. तर दुसरीकडे गोवा हे राज्य कोरोना मुक्त झाल्यामुळे राज्यात स्थानिक पर्यटक येण्यास लवकरच सुरुवात होईल अशी माहिती गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक (Governor SP Malik) यांनी दिली आहे. तर गोव्यात परदेशी पर्यटन सुरु होण्यास थोडा वेळ लागेल असेही त्यांनी सागितले आहे.

ANI ने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी असे सांगितले की, "गोवा राज्य कोरोना मुक्त आहे त्यामुळे येथे स्थानिक पर्यटक येऊ शकतील. मात्र परदेशी पर्यटनास थोडा वेळ लागेल. पण तेही लवकरच सुरु करणयाचा प्रयत्न करु". सध्याची स्थिती जास्त काळ राहणार नाही असेही ते म्हणाले. Coronavirus: भारतात 6654 नव्या रुग्णांसह देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,25,101 वर

भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असून या राज्यात 44,582 रुग्ण आढळले आहे. तर एकूण 1517 रुग्ण दगावल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यापाठोपाठ तमिळनाडू, गुजरात, नवी दिल्लीत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत.