गोवा येथे कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती खोटी, आरोग्य मंत्र्यांचे स्पष्टीकरण

त्यामुळे वारंवार नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. ऐवढेच नाही तर कोरोना व्हायरसमुळे घाबरुन जाऊ नये असे ही सांगण्यात येत आहे.

गोव्यात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण नाही (Photo Credits-ANI)

राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्याची संख्या 42 वर पोहचली आहे. त्यामुळे वारंवार नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. ऐवढेच नाही तर कोरोना व्हायरसमुळे घाबरुन जाऊ नये असे ही सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभुमीवर गोवा येथे कोरोना व्हायरसचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे वृत्त सोशल मीडियात परसले होते. यावर आता गोव्याचे आरोग्यमंत्री यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, गोव्यात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती ही खोटी आहे.

गोव्यात कोरोना व्हायरसचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती फोनवरुन डॉ. एडविन यांना देण्यात आली होती. त्यानुसार ज्या क्रमांकावरुन कोरोना संबंधित फोन आला त्याची तपासणी केली जात आहे. मात्र गोव्यात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती खोटी असून कोणीही घाबरुन जाण्याची गरज नाही आहे. अंतिम रिपोर्ट येण्याची वाट पाहत असून पुढील माहिती डॉ. उत्कर्ष यांच्याकडून स्पष्ट केली जाणार आहे.(राज्यात बनावट सॅनिटायझर विकणाऱ्यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात- राजेंद्र शिंगणे)

तर पुण्यात अजून एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या 42 वर पोहतली आहे. सदर महिलेने फ्रान्स आणि नेदरलॅन्ड्स येथून प्रवास करुन भारतात दाखल झाली होती. याबाबत पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अधिकृत माहिती दिली आहे. तसेच भारतात कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा आकडा 140 च्या पार गेला आहे. यापैकी दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्र येथे कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.