गोवा येथून जवळजवळ 2100 स्थलांतरित कामगारांना घेऊन जम्मू-कश्मीरसाठी 2 विशेष गाड्या रवाना- प्रमोद सावंत

त्यामुळे लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. लॉकडाउनच्या काळात हातावर पोट असलेल्या स्थलांतरित कामगार आणि मजूरांचे हाल झाले आहेत.

Goa CM Pramod Sawant (Photo Credits-ANI)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्याने त्याच्या रुग्णांसह बळींचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. लॉकडाउनच्या काळात हातावर पोट असलेल्या स्थलांतरित कामगार आणि मजूरांचे हाल झाले आहेत. परंतु आता केंद्र सरकारने श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु करण्यात आले असून त्यांना आपल्या घरी पाठवले जात आहेत. तर आता गोवा येथून जवळजवळ 2100 स्थलांतरित कामगारांना घेऊन जम्मू-कश्मीरसाठी 2 विशेष गाड्या रवाना करण्यात आल्याची माहिती गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

गोवा हे राज्य कोरोनामुक्त झाले असले तरीही तेथे लॉकडाउनच्या आदेशाचे पालन करण्यात येत आहे. तसेच गोव्यात अद्याप नाईट लाईफ, ब्युटीपार्लर, मसाज सेंटर, चित्रपटगृहांसह अन्य गोष्टी बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचसोबत पर्यटनाला सुद्धा गोव्यात बंदी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आता गोव्यात अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना आपल्या घरी पाठवण्यासाठी गाड्या पाठवल्या आहेत.(भारतीय रेल्वे प्रशासनाकडून 12 मे पासून सुरु होणाऱ्या 30 स्पेशल गाड्यांचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या वेळ)

दरम्यान, देशभरात आतापर्यंत 20917 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तसेच 44029 जणांवर अद्याप उपचार सुरु आहेत. गेल्या 24 तासात भारतात 4213 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 1559 जणांची प्रकृती सुधारली आहे. देशात रिकव्हरी रेट 31.15 टक्के असल्याचे ही आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. देशातील कोरोनाबाधितांची एकूण आकडेवारी पाहता 67,152 वर आकडा पोहचल्याची माहिती लव अगरवाल यांनी दिली आहे.