Ghost Shopping Centre In India: देशात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत 'घोस्ट शॉपिंग सेंटर्स'; अहवालात समोर आली धक्कादायक आकडेवारी, जाणून घ्या सविस्तर

बेंगळुरूमध्ये 12 आणि मुंबईत 10 आहेत. त्याचप्रमाणे कोलकात्यात 6, हैदराबादमध्ये 5, अहमदाबादमध्ये 4 आणि चेन्नईमध्ये तीन आणि पुण्यात तीन आहेत.

Representative Image (Pexels.com)

Ghost Shopping Centre In India: कोरोना विषाणू महामारीनंतर लोकांची जीवनशैली, सवयी अशा अनेक गोष्टी बदलल्या. याकाळात ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन खरेदीला प्राधान्य दिले जाऊ लागले व आता परिस्थिती अशी आहे की, गेल्या तीन वर्षात लोकांचे ऑफलाईन खरेदीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. म्हणूनच देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये अनेक शॉपिंग मॉल्स रिकामे पडले आहेत. देशातील आठ प्रमुख शहरांमधील रिकामे शॉपिंग मॉल्स म्हणजेच घोस्ट शॉपिंग सेंटर्सची (Ghost Shopping Centre) संख्या गेल्या वर्षी 57 वरून 64 वर गेली आहे.

रिअल इस्टेट सल्लागार नाइट फ्रँक इंडियाने मंगळवारी 'थिंक इंडिया थिंक रिटेल 2024' नावाचा अहवाल प्रसिद्ध केला. यामध्ये 29 शहरांतील शॉपिंग सेंटर्स आणि मोठ्या बाजारपेठांचा विचार करण्यात आला आहे. अहवालानुसार, आठ प्रमुख महानगरांमध्ये रिकाम्या रिटेल मालमत्तांची संख्या झपाट्याने वाढली आहे.

याआधी 2023 मध्ये सुमारे 1.33 कोटी चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या एकूण भाडेतत्त्वावरील 64 शॉपिंग मॉल्सचे 'घोस्ट शॉपिंग सेंटर्स' म्हणून वर्गीकरण करण्यात आले. 'घोस्ट शॉपिंग सेंटर्स' म्हणजे असे मॉल्स जिथला 40 टक्क्यांहून अधिक भाग रिक्त असतो. घोस्ट शॉपिंग सेंटर्सची संख्या वाढल्याने 6700 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

या अहवालानुसार, आठ शहरांमधील एकूण 64 रिक्त मॉलपैकी 21 मॉल दिल्ली-एनसीआरमध्ये आहेत. बेंगळुरूमध्ये 12 आणि मुंबईत 10 आहेत. त्याचप्रमाणे कोलकात्यात 6, हैदराबादमध्ये 5, अहमदाबादमध्ये 4 आणि चेन्नईमध्ये तीन आणि पुण्यात तीन आहेत. नाइट फ्रँक इंडियाच्या अहवालानुसार, क्षेत्रफळाचा विचार केल्यास, घोस्ट मॉलच्या बाबतीत दिल्ली अव्वल स्थानावर आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये 53 लाख स्क्वेअर फूट स्टॉक घोस्ट शॉपिंग सेंटर्स आहेत. (हेही वाचा: TikTok Sues US Government: टिकटॉकने अमेरिकन सरकारविरुद्ध दाखल केला खटला; सक्तीची विक्री किंवा बंदीचा कडाडून विरोध, जाणून घ्या काय आहे प्रकरण)

दिल्ली-एनसीआर नंतर मुंबई आहे, जिथे 21 लाख स्क्वेअर फुट घोस्ट शॉपिंग सेंटर आहे. तिसऱ्या क्रमांकावर बेंगळुरू आहे, जिथे 20 लाख स्क्वेअर फूट घोस्ट शॉपिंग सेंटर्सआहेत. नाइट फ्रँकने आपल्या अहवालात म्हटले आहे की, एका वर्षात महानगरांमधील शॉपिंग सेंटर्सची संख्या कमी झाली आहे. 2023 मध्ये एकूण शॉपिंग सेंटर्स 263 पर्यंत कमी झाले. गेल्या वर्षी 16 शॉपिंग मॉल्स बंद पडले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif