गौतम अदानी यांच्या Adani Green Energy ला मिळाले जगातील सर्वात मोठ्या सौर उर्जा प्रकल्पाचे कंत्राट; 45,300 कोटींची लावली होती बोली, रातोरात वधारले कंपनीचे शेअर्स
एक मोठे उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांची कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडला (Adani Green Energy), जगातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प उभारण्याचे कंत्राट (World's Largest Solar Bid) मिळाले आहे
एक मोठे उद्योजक गौतम अदानी (Gautam Adani) यांची कंपनी अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडला (Adani Green Energy), जगातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प उभारण्याचे कंत्राट (World's Largest Solar Bid) मिळाले आहे. त्याअंतर्गत अदानी ग्रीन एनर्जी 8,000 मेगावॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प तयार करेल. याव्यतिरिक्त, कंपनी 2 हजार मेगावॅट घरगुती सौर पॅनेल तयार करेल. 6 अब्ज डॉलर्स किंवा सुमारे 45,300 कोटी रुपयांच्या या निविदामुळे अदानी ग्रुप कंपनीने जगातील सर्वात मोठे सौर उर्जा कंत्राट मिळवले आहे. अदानी ग्रीन एनर्जीबरोबरच अझर पॉवरला (Azure Power) 4,000 मेगावॅटचा फोटोव्होल्टेईक पॉवर प्लांट तयार करण्याचे कंत्राटही मिळाले आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये या करारासाठी बोली मागविण्यात आली होती.
अदानी ग्रुपच्या जवळच्या सूत्रांच्या माहितीनुसार, कंपनी राजस्थान आणि गुजरातमध्ये ही सुविधा उपलब्ध करु शकते. राजस्थान सरकारने कंपनीच्या वतीने जैसलमेर, बीकानेर, जोधपूर, जलोर आणि बाडमेरमध्ये सौर पायाभूत सुविधा उभारण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. कंपनी गुजरातमधील कच्छ येथे एक प्रकल्प स्थापित करू शकते. सध्या भारतात सौर सेल उत्पादन क्षमता 3300 मेगावॅट आहे आणि मॉड्यूल तयार करण्याची क्षमता 8000 मेगावॅट आहे. अदानी कंपनीच्या प्रकल्पामुळे चार लाख लोकांना थेट आणि अप्रत्यक्षरित्या रोगर मिळणार आहेत. प्रकल्प सुरू झाल्यावर कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनाचे प्रमाणे 90 दशलक्ष टनांनी कमी होईल. (हेही वाचा: Coronavirus Effect On Indian Economy: विद्यमान वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 3.2% घसरु शकतो- जागतिक बँक)
ही मोठी ऑर्डर मिळाल्यामुळे मंगळवारी कंपनीचे शेअर्स वाढले. हे शेअर्स 4.98 टक्क्यांनी वधारून 312.75 रुपये झाले. जिथे जगातील कंपन्या कोरोनामुळे त्रस्त आहेत, तिथे अदानी ग्रीन यांनी म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीचा त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला नाही. यावर्षी अदानी ग्रीनच्या समभागात 88 टक्के वाढ झाली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)