Gautam Adani: गौतम अदानी जागातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती, बर्नार्ड अरनॉल्ट यांना टाकले मागे; ब्लूमबर्क बिलेनीयर्स इंडेक्स अहवाल प्रसिद्ध
फ्रान्सच्या बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault) यांना मागे टाकत अदानी यांनी ही कामगिरी केली आहे. ब्लूमबर्क बिलेनीयर्स इंडेक्स (Bloomberg Billionaires Index) ने नुकताच याबाबत एक अहवाल जाहीर केला.
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अडानी हे आता जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. फ्रान्सच्या बर्नार्ड अरनॉल्ट (Bernard Arnault ) यांना मागे टाकत अदानी यांनी ही कामगिरी केली आहे. ब्लूमबर्क बिलेनीयर्स इंडेक्स (Bloomberg Billionaires Index) ने नुकताच याबाबत एक अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार जगभरातील अब्जाधीशांची यादी जाहीर केली जाते. यात भारतीयांमध्ये अदानींचा क्रमाक पहिला आहे. गौतम अदानी यांची एकूण संपत्ती 137 बिलियन डॉलरवर पोहोचली आहे. 60 वर्षीय यशस्वी उद्योजकांच्या यादीत आता केवळ एलन मस्क आणि जेफ बोझेस हे दोघेच अदानी यांच्यापेक्षा दोन पावले पुढे आहेत.
टेस्ला कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांची एकूण संपत्ती 251 बिलियन डॉलर आहे तर अमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेजोस यांची संपत्ती 153 बिलियन डॉलर आहे. त्यामुळे भविष्यात अदानी यांची संपत्ती आणखी वाढली तर अदानी हे सुद्धा जगातील श्रीमंत व्यक्तीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर दिसू शकतात. (हेही वाचा, Gautam Adani पुन्हा बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; Mukesh Ambani यांनाही टाकले मागे, जाणून घ्या किती आहे संपत्ती)
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार गौतम अदानी यांनी LVMH मोएट हेनेसी लुई वुइटन चे सह संस्थापक, फ्रेश बिजनेस मॅग्नेट बर्नार्ट अरनॉल्ट यांना पाठिमागे टाकत जगातील तिसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती ठरण्याचा बहुमान पटकावला. ब्लूमर्गच्या एका अहवालानुसार, आजवरच्या इतिहासात प्रथमच एखाद्या एशियाई व्यक्तीने जगातील पहिल्या तिन श्रीमंत व्यक्तीमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. भारतीय यशस्वी उद्योजक मुकेश अंबानी आणि चीनस्थित अलीबाब समूहाचे जॅक मा तसेच इतर अशियाई यांना मात्र श्रीमंत व्यक्तीच्या यादीत स्थान मिळवता आले नाही.
गौतम अदानी हे अडानी समूहाचे सह संस्थापक आहेत. हा समूह देशातील सर्वात मोठा पोर्ट ऑपरेटर आहे. समूह देशातील सर्वात मोठा कोळसा व्यापारी म्हणूनही ओळखला जातो. अदानी एंटरप्रायजेस द्वारा एका वर्षात 31 मार्च 2021 पर्यंत 5.3 बिलियन डॉलरचा महसूल देण्यात आला. जो अशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेल्या व्यक्तींपैकी ब्लूमबर्गच्या प्रोफाईलवर प्रकाश टाकतो.
ट्विट
पाठिमागच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर समूहाने घोषणा केली होती की, अडानी समूह भारतातील एक आघाडीची वृत्तवाहीनी समूह असलेलेल्या एनडीटीव्हीमध्ये 29% भागिदारी घेत आहे. प्रसारमाध्यमांतून हे वृत्त जोरकसपणे पुढे आले होते. दरम्यान, एनडीटीव्हीने म्हटले आहे की, हा व्यवहार सीबीच्या मंजूरीच्या अधीन आहे. ज्याला समूहाने अस्वीकार केले आहे.