Gangster Atiq Ahmed: गँगस्टर अतिक अहमदला उत्तर प्रदेश पोलिसांकडून खोट्या चकमकीत मारले जाण्याची भीती, वाचा संपुर्ण प्रकरण

अहमदाबादमधील साबरमती कारागृहाबाहेर सुरक्षा कर्मचार्‍यांनी पोलिस वाहनातून नेत असताना अतिक अहमद यांनी पत्रकारांजवळ आपल्याला मारले जाण्याची भीती व्यक्त केली.

Atiq Ahmed (Image Credit- Twitter - ANI)

उत्तर प्रदेश पोलिसांकडून बनावट चकमकीत मारले जाण्याची भीती गँगस्टर अतिक अहमद याने व्यक्त केली आहे. गँगस्टर ते नेता बनलेला अतिक अहमदला गुजरातमधील साबरमती तुरुंगातून उत्तर प्रदेशच्या प्रयागराजला नेण्यात येत आहे. अहमदाबादमधील साबरमती कारागृहाबाहेर सुरक्षा कर्मचार्‍यांनी पोलिस वाहनातून नेत असताना अतिक अहमद यांनी पत्रकारांजवळ आपल्याला मारले जाण्याची भीती व्यक्त केली. "मुझे इंका प्रोग्राम मालूम है. हत्या करना चाहते हैं " असे तो यावेळी म्हणाला.

उत्तर प्रदेश पोलिसांचे एक पथक सकाळी अहमदाबाद शहरातील साबरमती तुरुंगात पोहोचले आणि कडेकोट बंदोबस्तात अतिक अहमदसोबत संध्याकाळी 6 च्या सुमारास बाहेर पडले. त्याला 28 मार्च रोजी अपहरण प्रकरणात न्यायालयात हजर केले जाणार आहे. नुकत्याच घडलेल्या उमेश पाल खून प्रकरणासह 100 हून अधिक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये त्याचे नाव आहे.

 

अतिक अहमद जून 2019 पासून साबरमती मध्यवर्ती कारागृहात बंद आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला त्याच्या मूळ राज्यातून तेथे हलवण्यात आले होते. 1 मार्च रोजी, त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि उत्तर प्रदेश पोलीस त्याच्या ट्रान्झिट रिमांडची मागणी करतील आणि या यावेळी आपला खात्मा केला जाईल अशी भीती त्यांने व्यक्त केली होती.

अहमदाबादच्या साबरमती कारागृहातून रविवारी संध्याकाळी अतिक अहमदला ताब्यात घेणाऱ्या यूपी पोलिसांनी मध्य प्रदेश गाठले आहे. अतीक अहमदचा ताफा मध्य प्रदेशानंतर आता यूपीत दाखल होणार आहे. असे म्हटले जात आहे की आज संध्याकाळपर्यंत यूपी पोलीस अतिक अहमदसोबत प्रयागराजला पोहोचू शकतात.