FSSAI On Dahi Row: दही शब्दावरून भाषेच्या राजकारणाची घुसळन, एफएसएसआय द्वारे नवे निर्देश

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India) म्हणजेच एफएसएसआय (FSSAI) ने दही हे नाव बदलण्याबाबत दिलेल्या निर्देशानंतर तामिळनाडू सरकार चांगलेच आक्रमक झाले. स्थानिक भाषांवर हिंदी लादली जात आहे. त्यामुळेच तामिळी 'तायर' या शब्दाऐवजी 'दही' असा उल्लेख करण्यास सांगण्यात येत आहे, असा आरोप FSSAI वर करण्यात आला होता.

Courd | (Fole Image)

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India) म्हणजेच एफएसएसआय (FSSAI) ने दही हे नाव बदलण्याबाबत दिलेल्या निर्देशानंतर तामिळनाडू सरकार चांगलेच आक्रमक झाले. स्थानिक भाषांवर हिंदी लादली जात आहे. त्यामुळेच तामिळी 'तायर' या शब्दाऐवजी 'दही' असा उल्लेख करण्यास सांगण्यात येत आहे, असा आरोप FSSAI वर करण्यात आला होता. तामिळनाडू सरकारच्या विरोधानंतर एफएसएसआय काहीसे वरमले असून नवे पत्रक काढत निर्देश जारी करण्यात आले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन (MK Stalin) यांनी एफएसएसआयवर आरोप केला होता.

FSSAI ने दिलेल्या नव्या निद्रेशानुसार, वेष्टनांवर दही वेगवेगळ्या प्रकारेही लिहीले जाऊ शकते. जसे की, कर्ड (दही), कर्ड (मोसरू), कर्ड (ज़ामुत दाउद), कर्ड (तायिर), कर्ड (पेरुगु) वगैरे वगैरे. झालेल्या प्रचंड विरोधानंतर एफएसएसएआईने गुरुवारी (30 मार्च) एक प्रसिद्धी पत्रक काढत नवे निर्देश जारी केले.

FSSAI आगोदरच्या निर्देशात म्हटले होते की, दह्याच्या सर्व पाकिटांवर तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यांमध्ये दही असाच उल्लेख असायला पाहिजे. उल्लेखनिय असे की, तामिळनडूमध्ये दह्याला तायिर किंवा मोसरु म्हटले जाते. मात्र, दक्षिण भारतीय नागरिकांकडून एफएसएसआयच्या निर्देशांना विरोध दर्शविण्यात आला. तामिळनाडू दूध उत्पादक संघांनी पाकिटांवर हिंदी शब्दाऐवजी तामिळ शब्द तायिरच वापरला जाईल असे म्हटले.

ट्विट

FSSAI म्हणजे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण. भारतात विकल्या जाणार्‍या खाद्यपदार्थांची सुरक्षा आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी 2006 मध्ये भारत सरकारने स्थापन केलेली ही नियामक संस्था आहे. FSSAI अन्न सुरक्षा मानके निश्चित करण्यासाठी, अन्न उत्पादनांचे उत्पादन, साठवण, वितरण, विक्री आणि आयात नियंत्रित करण्यासाठी आणि भारतात अन्न सुरक्षा कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार आहे. ग्राहक आणि भागधारकांमध्ये अन्न सुरक्षा आणि पोषण याबाबत जागरुकता निर्माण करण्याची जबाबदारीही प्राधिकरणाची आहे. मानवी वापरासाठी सुरक्षित आणि पौष्टिक अन्नाची उपलब्धता सुनिश्चित करून सार्वजनिक आरोग्याचा प्रचार आणि संरक्षण करणे हे FSSAI चे उद्दिष्ट आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now