आजपासून 'या' नियमात मोठे बदल, जाणून घ्या नाहीतर होईल नुकसान
मात्र काही नियम सुद्धा बदलले असून त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. खरंतर 1 डिसेंबरपासून एलआयसी, पीएम-किसान सम्मान निधी योजना, मोबाईल टॅरिफ यांच्याशी निगडीत नियमात बदलणार आहेत.
आजपासून वर्षाअखेरीच्या महिन्याला सुरुवात झाली आहे. मात्र काही नियम सुद्धा बदलले असून त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. खरंतर 1 डिसेंबरपासून एलआयसी, पीएम-किसान सम्मान निधी योजना, मोबाईल टॅरिफ यांच्याशी निगडीत नियमात बदलणार आहेत. तर प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या बाबत नियमात बदल केले जात असून त्याबाबत जनतेला माहिती असणे अत्यावश्यक असते. नाहीतर मोठे नुकसान होण्याची शक्यता फार असते. तर जाणून घ्या कोणत्या नियमात आजपासून बदल झाले आहेत.
मोदी सरकारने पीएम- किसान सम्मान योदनेअंतर्गत पैसे मिळवण्यासाठी आधार क्रमांक लिंक करण्याची शेवट तारीख 30 नोव्हेंबर ठरवली होती. त्यामुळे ज्यांनी या नियमाअंतर्गत आधार कार्ड लिंक केले नसल्यास त्यांच्या खात्यात 6 हजार रुपये जमा होणार नाही आहेत. खात्यात जमा होणारी ही रक्कम शेतकऱ्यांना मदत म्हणून देण्यात येणार आहे. तसेच जम्मू-कश्मीर. लद्दाख, आसाम आणि मेघालय येथील शेतकऱ्यांना 31 मार्च 2020 पर्यंतचा वेळ आधार कार्ड लिंक करण्यासाठी देऊ केला आहे.
या वर्षाच्या अखेरीस बदललेल्या नियमानुसार फोन उपभोक्तांना कॉलिंगसाठी इंटरनेटचा वापर करणे सुद्धा महाग होणार आहे. म्हणजेच टेलिकॉम कंपन्या त्यांच्या टॅरिफ प्लॅनमधील रक्कमेत बदल करुन त्याच्या किंमती वाढवणार आहेत. 14 वर्ष जुन्या एजीआर प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर टॅरिफमध्ये वाढ करण्याचा विचार केला आहे.(7th Pay Commission News: सातव्या वेतन आयोगाचा फायदा खाजगी शाळांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा मिळणार? जाणून घ्या)
डिसेंबर महिन्यात लाइफ इन्शुरन्स संबंधित काही नियमात बदल होणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही नवी पॉलिसी काढत असल्यास थोडा वेळ थांबा. कारण आयआरडीएआय आजपासून नवे नियम लागू करत आहे. त्यानुसार इन्शुरन्सचा प्रीमियम थोडा महाग होणार आहे. आयडीबीआय फेडरल लाइफ इन्शुरन्सचे सीएमओ कार्तिक रमन यांनी असे म्हटले आहे की, इन्शुरन्सचा प्रीमीअम महागला असला तरीही त्यांना उत्तम सुविधा देण्यात येणार आहेत.