Mumbai Shocker: दादर स्थित महिलेची 47 हजारांची फसवणूक; चेक क्लोन, स्वाक्षरीची नक्कल करून घातला गंडा
मुंबईत दादर भागामध्ये एका महिलेची चेक क्लोन करून तब्बल 47 हजारांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुंबईत दादर भागामध्ये एका महिलेची चेक क्लोन करून तब्बल 47 हजारांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये तिला अकाऊंट मधून 47 हजार डेबिट झाले असल्याचा मेसेज आला. त्यानंतर हा प्रकार प्रकाशात आला. या मेसेजमध्येही तिचे पैसे चेक द्वारा डेबिट झाले असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे आता बदलत्या आणि प्रगत होत चाललेल्या तंत्रज्ञाना सोबतच फसवणूकीचे प्रकारही गंभीर होत असल्याचं समोर येत आहे.
मीड डे सोबत बोलत असताना महिलेने दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये, 'जसा प्रकार समजला तशी मी दुसर्याच दिवशी बॅंकेमध्ये पोहचली. त्यावेळी सुरूवातीला बॅंक कर्मचार्यांनी तुम्हीच Mithon Kumar च्या नावाने चेक दिला असेल असं म्हटलं.पण त्याला नंतर सारं उर्वरित चेकबूक दाखवलं तेव्हा त्याचा विश्वास पटला.'
चेक देताना सही देखील आवश्यक असते त्यामुळे कुणीतरी आपल्या स्वाक्षरीची देखील कॉपी केल्याचा संशय आहे असेही त्या म्हणाल्या. महिलेला जेव्हा एचडीएफसी बॅंकेने सांगितलं की चेक तुमच्याकडून गेलेला नाही तेव्हा जरा त्या शांत झाल्या. त्यांनी चेक बूक मध्ये उरलेले चेक देखील क्रॉस चेक करून पाहिले.
महिलेने जेव्हा बॅंकेमध्ये जाऊन सारा प्रकार पाहता त्याचा जाब विचारला तेव्हा बॅंकेने चेकची ड्युप्लिकेट कॉपी समोर आल्याचं सांगितलं. चेक बॅंकेला मिळाला असल्याने त्यांना पोलिस स्ठानकामध्ये आता तक्रार करावी लागली नाही.
विशेष म्हणजे ज्या बँकेत महिलेचे पैसे जमा झाले, त्या बँकेने ही रक्कम महिलेच्या खात्यात परत केली आहे. एचडीएफसी कडून सांगितल्यानुसार, "चेक ट्रंकेशन सिस्टीम अंतर्गत एक चेक दुसर्या बँकेत सादर करण्यात आला होता. काही पडताळणीनंतर आम्ही पोलिसांकडे जाऊ आणि महिलेला पोलिस तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे."