IPL Auction 2025 Live

RG Kar Medical College Rape Case: माजी पोलिस आयुक्त विनीत गोयल यांनी संपूर्ण कट रचला आणि मला यात फसवले; आरोपी संजय रॉयचा खळबळजनक आरोप

कोलकाताचे माजी पोलिस आयुक्त विनीत गोयल यांनी या संपूर्ण प्रकरणाचा कट रचून आपल्याला यात गोवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप संजय रॉय याने केला आहे.

Accused Sanjay Roy (फोटो सौजन्य - ANI)

RG Kar Medical College Rape Case: आरजी कार हॉस्पिटल बलात्कार आणि हत्या प्रकरणातील ( RG Kar Hospital Rape And Murder Case) मुख्य आरोपी संजय रॉय (Sanjay Roy) ने सोमवारी धक्कादायक दावा केला आहे. कोलकाताचे माजी पोलिस आयुक्त विनीत गोयल (Former Kolkata Police Commissioner Vineet Goyal) यांनी या संपूर्ण प्रकरणाचा कट रचून आपल्याला यात गोवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप संजय रॉय याने केला आहे. सियालदह न्यायालयातून नेत असताना पोलिस व्हॅनमधून त्याने हे धक्कादायक आरोप केले.

यासंदर्भात बोलताना संजय रॉय म्हणाला की, मी तुम्हाला सांगतोय की विनीत गोयल (माजी कोलकाता पोलिस आयुक्त) यांनी या संपूर्ण घटनेचा कट रचला आणि मला फसवले. आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आज मुख्य आरोपी संजय रॉय याला कोलकाता न्यायालयात हजर करण्यात आले होते. (हेही वाचा -HC on RG Kar Medical College Vandalism: 'रुग्णांना हलवा आणि रुग्णालय बंद करा', आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयाच्या तोडफोडीच्या घटनेवरून कोलकाता उच्च न्यायालयाने ममता सरकारवर ताशेरे)

आरोपी संजय रॉयचा माजी पोलिस आयुक्त विनीत गोयल यांच्यावर खळबळजनक आरोप, पहा व्हिडिओ -

प्राप्त माहितीनुसार, दुपारी संजय रॉयला न्यायालयात हजर करण्यात आले. भारतीय न्याय संहिताच्या कलम 64 (बलात्कार), 66 (मृत्यूला कारणीभूत) आणि 103 (हत्येची शिक्षा) अंतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरजी कार हॉस्पिटलच्या सेमिनार रूममध्ये कथित बलात्कार आणि हत्या करण्यात आलेल्या महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्यानंतर कोलकाता पोलिसांनी संजय रॉय याला अटक केली होती. यानंतर, कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे. (हेही वाचा -Suspicious Bag Found Near RG Kar Medical College: कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलजवळ आंदोलनस्थळी सापडली संशयास्पद बॅग; बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल)

दरम्यान, गेल्या महिन्यात दाखल केलेल्या प्राथमिक आरोपपत्रात केंद्रीय अन्वेषण विभागाने रॉयचे या प्रकरणातील 'एकमेव मुख्य आरोपी' म्हणून वर्णन केले होते. सीबीआयच्या आरोपपत्रात या गुन्ह्यामागे मोठे कारस्थान असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. 9 ऑगस्ट रोजी आरजी कार हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला होता, त्यानंतर पश्चिम बंगालमधील कनिष्ठ डॉक्टरांनी या प्रकरणात न्याय मिळावा या मागणीसाठी आंदोलन सुरू केले होते.