Bharat Ratna: चौधरी चरण सिंग, पीव्ही नरसिंह राव आणि डॉ. एमएस स्वामिनाथन यांना भारतरत्न जाहीर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली. पंतप्रधानांनी आपल्या एक्स हँडलवर माहिती देताना सांगितले की, आमच्या सरकारचे हे भाग्य आहे की, आम्ही देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देऊन सन्मानीत करत आहोत.

MS Swaminathan, PV Narasimha Rao and Charan Singh | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग (Chaudhary Charan Singh) आणि पीव्ही नरसिंह राव ( PV Narasimha Rao) यांच्यासह डॉ. एमएस स्वामिनाथन ( MS Swaminathan) यांना भारतरत्न (Bharat Ratna) प्रदान करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ही घोषणा केली. पंतप्रधानांनी आपल्या एक्स हँडलवर माहिती देताना सांगितले की, आमच्या सरकारचे हे भाग्य आहे की, आम्ही देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देऊन सन्मानीत करत आहोत. हा सन्मान त्यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगादानास समर्पीत आहे.

चौधरी चरण सिंह यांचे पंतप्रधानांकडून कौतुक

पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, चौधरी चरणसिंह यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांसाठी समर्पित केले. त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून केलेले काम असो की, देशाचे गृहमंत्री म्हणून पार पाडलेली जबाबारी असो. त्यांनी नेहमीच शेतकरी आणि देशाच्या हिताचे काम केले. आणीबाणीला विरोध करण्यासाठीही ते धाडसाने उभे राहिले. त्या काळातही त्यांनी शेतकऱ्यांप्रती मोठी जबाबदारी पार पाडली. (हेही वाचा, Bharat Ratna Award Announced to LK Advani: लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा)

पीव्ही नरसिंह राव: प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी

माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांनाही भारतत्न पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्याबाबत एक्स हँडलवर लिहिलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मदी यांनी म्हटले आहे की, नरसिंह राव यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. ते एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी होते. त्यांनी त्यांची क्षमता देशासाठी विविध क्षेत्रात वापरुन सेवा केली. ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्षे खासदार, आमदार राहिले. त्यांनी प्रत्येक भूमिकेते केलेले कार्य त्यांच्या दूरदृष्टीसाठी स्वतंत्रपणे ओळखले जाते. त्यामुळे ते सर्वांच्याच लक्षात राहतात. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनवण्यात आणि देशाच्या समृद्धीचा भक्कम पाया रचण्यात मोलाचा वाटा होता. (हेही वाचा, Karpoori Thakur यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर; आज 100 वी जयंती!)

डॉ. एमएस स्वामिनाथन यांनाही भारतरत्न

राष्ट्रासाठी कृषी आणि शेतकरी कल्याणात दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेत डॉ. एमएस स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार असल्याची घोषणाही पंतप्रधानांनी केली. आपल्या एक्स हँडलवरुन ही माहिती देताना त्यांनी म्हटले की, स्वामिनाथन यांनी आव्हानात्मक काळात भारताला शेतीमध्ये स्वावलंबन केले. भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणासाठी कायम उत्कृष्ट प्रयत्न केले. नवोदित आणि मार्गदर्शक म्हणून त्यांचे बहुमोल कार्य आम्ही नेहमीच स्मरणात ठेवतो. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण आणि संशोधनाला प्रोत्साहन दिले. डॉ. स्वामीनाथन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने केवळ भारतीय शेतीच नव्हे तर एकूण कृषी क्षेत्रातही परिवर्तन घडवून आणले आहे. देशाची अन्न सुरक्षा आणि समृद्धी सुनिश्चित केली. ते माझ्या निकटवर्तींयांपैकी एक होते. मी त्यांच्या अंतर्दृष्टी आणि इनपुटची नेहमीच कदर केली, असेही पंतप्रधान म्हणाले.