Om Prakash Chautala: हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना चार वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांचा दंड; बेहिशेबी मालमत्ता प्रकरण
एका बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात कोर्टाने त्यांना ही शिक्षा ठोठावली. या शिक्षेसोबतच चौटाला यांच्या चार मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत. यात हेलीरोड, पंचकूला, गुरुग्राम आणि असोला येथील संपत्तीचा समावेश आहे.
हरियाणाचे (Haryana ) माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला (Om Prakash Chautala) यांना चार वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. एका बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात कोर्टाने त्यांना ही शिक्षा ठोठावली. या शिक्षेसोबतच चौटाला यांच्या चार मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत. यात हेलीरोड, पंचकूला, गुरुग्राम आणि असोला येथील संपत्तीचा समावेश आहे. या आधी दिल्लीतील एका न्यायालयाने चोटाला यांना उत्पन्नाच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा धिक संपत्ती जमा केल्या प्रकरणी दोषी ठरवले होते. विशेष न्यायाधीश विकास ढूल यांनी निर्णय देत पुठची सुनावणी 26 मे ही तारीख निश्चित केली होती. उल्लेखनीय असे की, सीबीआय (CBI) ने वर्ष 2005मध्ये एफआयआर दाखल केली आहे.
ओमप्रकाश चौटाला यांनी 26 मार्च 2010 रोजी आरोपपत्र दाखल केले होते. ज्यात आरोप करण्यात आला होता की चौटाला यांची 6.09 कोटी रुपयांची संपत्ती 1993 ते 2006 या कालावधीत त्यांची संपत्ती उत्पन्नाच्या स्त्रोतापेक्षा अधिक आहे. (हेही वाचा, हरियाणातील एका पित्याचे पोटच्या मुलीसोबत अमानवी कृत्य, गुप्तांगात धारदार वस्तूने केल्या जखमा)
ओमप्रकाश चौटाला यांनी शिक्षक भरती घोटाळ्यात 10 वर्षांची शिक्षा भोगली आहे. शिक्षा भोगताना वेळेचा सदुपयोग करत हरियाणाचे 82 वर्षीय माजी मूख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांनी इयत्ता 12 वीची परीक्षा पहिल्या श्रेणीत उत्तर्ण केली. सजेच्या काळात त्यांनी तिहार जेलमध्ये कैद्यांसाठी बनविण्यात आलेल्या सेंटरवर नॅशनल ओपन स्कूलद्वारा करण्यात आलेल्या इयत्ता 12वीच्या परीक्षेत सहभाग नोंदवला होता. अंतिम परीक्षा 23 एप्रिल रोजी झाली होती. ज्या वेळी परीक्षा झाली तेव्हा ते पॅरोलवरती बाहेर होते आणि परिक्षा केंद्र कारागृहात होते. या वेळी ते पुन्हा एकदा कारागृहात गेले. त्यांनी परीक्षा दिली आणि ते उत्तीर्णही झाले.