IPL Auction 2025 Live

पश्चिम बंगाल येथे 7 मार्चला होणा-या PM Modi च्या मेळाव्यात माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार? दिलीप घोष यांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

तसेच याविषयी कोणतीही चर्चा बैठकीत झाली नाही असेही ते म्हणाले.

Sourav Ganguly And Dilip Ghosh (Photo Credits: PTI)

माजी क्रिकेटपटू आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) भाजपमध्ये प्रवेश करणार अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) येत्या 7 मार्चला ब्रिगेड मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली सामील होणार असल्याची शक्यता आहे. तसेच या कार्यक्रमादरम्यान ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी देखील चर्चा रंगू लागली आहे. याबाबत पश्चिम बंगालचे प्रमुख दिलीप घोष (Dilip Ghosh) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही असे ते मिडियाशी बोलताना म्हणाले.

सौरव गांगुली यांच्या भाजप प्रवेशाबद्दल पश्चिम बंगालचे प्रमुख दिलीप घोष यांना विचारले असता मला याबाबत काहीही माहिती नाही. तसेच याविषयी कोणतीही चर्चा बैठकीत झाली नाही असेही ते म्हणाले.हेदेखील वाचा- Sourav Ganguly Health Update: बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना आज रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

पश्चिम बंगालमध्ये होणा-या आगामी निवडणूकांमध्ये जोरदार चुरस रंगली आहे. कोणता पक्ष या निवडणुकीत बाजी मारणार आणि कोण वरचढ चढणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान सौरव गांगुली भाजपात गेल्यास सौरव गांगुली यांच्या प्रसिद्धीचा आणि पश्चिम बंगाल मधील त्यांच्या असंख्य चाहत्यावर्गाचा पक्षाला नक्कीच फायदा होईल. ज्यामुळे निवडणुकीचे चित्र देखील बदलेल.

दरम्यान सौरव गांगुली यांनी या मेळाव्यात सामील होणार नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तथापि त्यांचे स्वास्थ्य जर चांगले असेल आणि त्यांना या मेळाव्यात सामील व्हायचे असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करतो अशी प्रतिक्रिया शामिक भट्टाचार्य यांनी दिली आहे.