Forbes 30 Under 30 Asia: फोर्ब्स ने जाहीर केली 30 अंडर 30 आशियाची यादी; अनेक भारतीयांनी मारली बाजी (See List)

Instadapp Labs चे सह-संस्थापक सम्यक जैन आणि सौम्या जैन यांनी देखील फोर्ब्स इंडिया 30 अंडर 30 मध्ये स्थान मिळवले आहे. ब्लॉकचेनच्या मदतीने जगाला एका नव्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या तरुण पिढीचे जैन ब्रदर्स प्रतिनिधित्व करतात.

Forbes 30 Under 30 Asia (संग्रहित संपादित प्रतिमा)

फोर्ब्सने आशियातील 30 वर्षांखालील 30 जणांची (Forbes 30 Under 30 Asia) यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक भारतीयांना स्थान मिळाले आहे. या यादीमध्ये अशा लोकांना स्थान देण्यात आले आहे जे त्यांच्या क्षेत्रात काहीतरी नवीन करत आहेत किंवा काहीतरी वेगळे करत आहेत. ज्याद्वारे त्यांचा उद्योग आणि आशियाला चांगले बनवण्यासाठी बदल घडवून आणत आहेत. hBits चे संस्थापक शिव पारेख यांचा फोर्ब्स 30 अंडर 30 एशिया 2022 च्या यादीत समावेश करण्यात आला आहे. Hbbits ने दावा केला की गेल्या वर्षाच्या अखेरीस त्याच्या नियंत्रणाखाली $20 दशलक्ष मालमत्ता होती, त्याचे 30,000 नोंदणीकृत वापरकर्ते आहेत.

Instadapp Labs चे सह-संस्थापक सम्यक जैन आणि सौम्या जैन यांनी देखील फोर्ब्स इंडिया 30 अंडर 30 मध्ये स्थान मिळवले आहे. ब्लॉकचेनच्या मदतीने जगाला एका नव्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या तरुण पिढीचे जैन ब्रदर्स प्रतिनिधित्व करतात. पुढे लविका अग्रवाल आणि सजल खन्ना यांचेही नाव यात सामील आहे. त्यांनी 2020 मध्ये जगवीर गांधी (30) यांच्यासोबत अकुडोची स्थापना केली. किशोरांना डिजिटल बँकेकडून प्रीपेड डेबिट कार्ड मिळवून देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे, जे त्यांना त्यांचे आर्थिक नियोजन करण्यास आणि पैशांची बचत करण्यास मदत करते.

या ठिकाणी पाहू शकता पूर्ण यादी - 

यामधील अजून एक महत्वाचे नाव आहे रोहन नायक. पॉकेट एफएमचे सह-संस्थापक निशांत केएस आणि प्रतीक दीक्षित यांच्यासह रोहन नायक यांनी मनोरंजनापासून शिक्षणापर्यंतच्या विषयांवर 8 भाषांमध्ये 1,00,000 तासांहून अधिक व्हिडिओ तयार आणि प्रसारित केले आहेत.

पुढील महत्वाचे नाव आहे ते म्हणजे, त्रिनेत्रा हलदर गुम्माराजू. गुम्माराजू ही भारतातील ट्रान्सजेंडर डॉक्टरांपैकी एक आहे जी सामाजिक, वैद्यकीय आणि कायदेशीर समस्या मांडण्यासाठी तिचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरते. लाइव्हमिंटच्या अहवालानुसार, तिच्या कंटेंटचे एकत्रित प्रेक्षक सुमारे 2,50,000 आहेत. (हेही वाचा: फार कमी कालावधीत क्वाड ग्रुपने जागतिक स्तरावर एक महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे, पंतप्रधान मोदींचे वक्तव्य)

फोर्ब्स 30 अंडर 30 एशिया 2022 च्या यादीमध्ये लेखक विवान मारवाह, कंटेंट क्रिएटर मासूम मिनाबाला, मॉन्क एंटरटेनमेंटचे सह-संस्थापक रणवीर अल्लाहबादिया आणि विराज शेठ यांचाही समावेश आहे. या व्यतिरिक्त कंटेंट क्रिएटर निहारिका एनएम, विंडो ड्रीम्स प्रोडक्शनचे संस्थापक श्रेया पटेल, टेक बर्नरचा संस्थापक श्लोक श्रीवास्तव, एबेल जॉब्सचे संस्थापक रवीश अग्रवाल, स्वतंत्र कुमार आणि सिद्धार्थ श्रीवास्तव यांचाही या यादीत समावेश आहे. ब्लूलर्नचे सह-संस्थापक हरीश उथयकुमार आणि श्रेयांस, याशिवाय रारा डिलिव्हरीचे संस्थापक करण भारद्वाज यांचाही या यादीत समावेश आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now