IPL Auction 2025 Live

पुरामुळे देशातील 14 राज्यांत तब्बल 1685 लोकांचे बळी; महाराष्ट्रात सर्वाधिक जीवितहानी; पहा आकडेवारी

भारतीय हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी 1994 नंतर सर्वाधिक पाऊस पडला आहे. नुकतीच केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी पुरामध्ये तब्बल 14 राज्यांत मिळून तब्बल 1685 लोकांचा बळी गेला आहे.

काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे आलेला महापूर (संग्रहित संपादित प्रतिमा)

अखेर यावर्षीचा मान्सून (Monsson) हंगाम समाप्त झाला आहे. भारतीय हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार यावर्षी 1994 नंतर सर्वाधिक पाऊस पडला आहे. नुकतीच केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी पुरामध्ये तब्बल 14 राज्यांत मिळून तब्बल 1685 लोकांचा बळी गेला आहे. महत्वाचे म्हणजे यामधील सर्वाधील लोक महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रात एकूण मृतांची संख्या 377 वर पोहचली आहे. यावर्षी 25 वर्षांमधील सर्वाधिक झालेल्या पावसाचा फटका देशातील 277 जिल्ह्यांना बसला आहे.

यावर्षी हवामान खात्याने 6 जूनला केरळ किनाऱ्यावर पाऊस पोहचेल असे सांगितले होते, मात्र मान्सून आठवडाभर उशिरा पोहचला. अद्याप देशाच्या अनेक भागात मान्सून सक्रीय असून, दक्षिण-पश्चिम मान्सूनची माघार 10 ऑक्टोबरच्या सुमारास वायव्य भारतातून सुरू होण्याची शक्यता आहे. या काळात पावसाने देशात हाहाकार माजवला होता. अजूनही बिहार येथे पूरस्थिती आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधील बळी गेले आहेत. त्यानंतर पश्चिम बंगाल राज्यात 225 लोकांचा बळी गेला आहे.

(हेही वाचा: यावर्षीचा मान्सून हंगाम समाप्त; 25 वर्षाचा विक्रम मोडीत, देशात 1994 नंतर सर्वाधिक पाऊस- IMD)

राज्यनिहाय आकडेवारी  -

आसाम - 97

ओडिशा -10

केरळ – 180

मध्य प्रदेश – 180

गुजरात – 150

बिहार – 130

कर्नाटक – 105

देशात एकूण 22 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 22 जिल्ह्य़ांमधील तब्बल सात लाख 73 हजार 299 लोकांचा समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 32 टक्के अधिक पाऊस झाला आहे. राज्यातील पुणे जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे, तर महाबळेश्वर हे जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण ठरले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, सातारा, नाशिक, धुळे येथे सरासरीपेक्षा 60 टक्क्यांहून अधिक पाऊस पडला आहे.