Online Shopping: मागवला एक ₹ 1 लाख किमतीचा Sony TV, मिळाला थॉमसन टीव्ही; Flipkart ने घेतली दखल

पण जेव्हा ऑर्डर त्याला वितरीत करण्यात आली तेव्हा पार्सल उघडून त्याला धक्काच बसला. त्याचा पुरता अपेक्षाभंग झाला होता. पार्सलमध्ये त्याला सोनी कंपनीचा नव्हे तर थॉमसन टीव्ही (Thomson TV) मिळाला होता.

Online Shopping | (File Image)

Online Shopping: ऑनलाईन शॉपिंग करताना ग्राहकांना अनेकदा निराशाजनक अनुभव सामोरे जावे लागते. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल (Flipkart Big Billion Days 2023) दरम्यान एका ग्राहकाला असाच काहीसा अनुभव आला. या ग्राहकाने फ्लिपकार्टवरुन तब्बल  ₹1 लाख किमतीचा सोनी टीव्ही ( Sony TV ) मागवला होता. पण जेव्हा ऑर्डर त्याला वितरीत करण्यात आली तेव्हा पार्सल उघडून त्याला धक्काच बसला. त्याचा पुरता अपेक्षाभंग झाला होता. पार्सलमध्ये त्याला सोनी कंपनीचा नव्हे तर थॉमसन टीव्ही (Thomson TV) मिळाला होता. लागलीच त्याने फ्लिपकार्टला याबाबत कळवले आणि तक्रारही केली. ज्याची फ्लिपकार्टनेही दखल घेतली आहे. आर्यन नामक ग्राहकासोबत ही घटना घडली.

आर्यन नावाच्या या ग्राहकाने त्याला आलेला अनुभव सोशल मीडियावरही शेअर केला आहे. सोशल मीडियावर त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मी 7 ऑक्टोबर रोजी @Flipkart वरून सोनी टीव्ही खरेदी केला होता. जो मला 10 ऑक्टोबर रोजी वितरित करण्यात आला आणि त्याच्या इंस्टॉलेशनसाठी 11 ऑक्टोबर रोजी सोनी इंस्टॉलेशनचा माणूस आला. त्याने स्वतः टीव्ही अनबॉक्स केला आणि आम्हालाच धक्का बसला. सोनी बॉक्समध्ये चक्क थॉमसन टीव्ही निघाला. इतकेच नव्हे तर बॉक्समध्ये ऑर्डरमध्ये नोंदविले आणि कबूल केलेप्रमाणे स्टँड, रिमोट इत्यादी कोणत्याही अॅक्सेसरीज नव्हत्या." ग्राहकाने ऑर्डर अनबॉक्सिंग प्रक्रियेची छायाचित्रेही सोशल मीडियावर शेअर केली. ग्राहकाने म्हटले आहे की, फ्लिपकार्टकडे संपर्क आणि तक्रार करुन दोन आठवडे उलटले तरी अद्याप फ्लिपकार्टने समस्या सडवली नाही.

ग्राहकाने पुढे म्हटले आहे की, प्रथम त्यांनी (फ्लिपकार्ट) मला 20 ऑक्टोबरची तारीख दिली आणि आगोदर 24 ऑक्टोबर आणि नंतर 1 नोव्हेंबरपर्यंत वाढवली. आजही त्यांनी हा प्रश्न सुटल्याचे सांगितले, पण अद्यापही टीव्ही परतीच्या प्रक्रियेबाबत कोणताही हालचाल नाही. मी BBD कडून टीव्ही विकत घेण्याची वाट पाहत आहे. जेणेकरून मी एका चांगल्या मोठ्या स्क्रीनवर विश्वचषक पाहू शकेन, परंतु FK च्या या सेवेने मला नाहक त्रासात ढकलले आहे, जे खरोखर असह्य आहे.

एक्सपोस्ट

दरम्यान, फ्लिपकार्टने आर्यनच्या व्हायरल पोस्टला प्रतिसाद दिला, रिटर्न रिक्वेस्ट आणि सहाय्य ऑफर करण्याच्या त्याच्या अनुभवाबद्दल माफी मागितली. ई-कॉमर्स कंपनीने आर्यनला या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्याच्या ऑर्डरचे तपशील खाजगीरित्या प्रदान करण्यास सांगितले. आर्यनच्या केसचा एक उल्लेखनीय पैलू असा आहे की त्याचा टेलिव्हिजन सेट डिलिव्हरीने वितरित केला होता, ही एक कुरिअर सेवा आहे. जी डिलिव्हरीच्या वेळी उत्पादनांची तपासणी करण्याचा पर्याय देत नाही.

एक्स पोस्ट

असंख्य वापरकर्त्यांनी आर्यनच्या पोस्टला प्रतिसाद दिला. ऑनलाइन शॉपिंग अनुभवांबद्दल त्यांच्या स्वतःच्या तक्रारी सामायिक केल्या. अनेकांनी आर्यनशी सहमती व्यक्त केली आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून महत्त्वपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स खरेदी करण्याबद्दल त्यांचे अनुभव व्यक्त केले. अशा घटनांचे त्वरित आणि कार्यक्षमतेने निराकरण करण्यासाठी कठोर सरकारी नियमांची मागणी देखील काही सोशल मीडिया युजर्सनी केली.