Atma Nirbhar Bharat Abhiyan: शेल्टर होममध्ये बेघर लोकांना मिळणार 3 वेळचे अन्न- अर्थमंत्री निर्मला सीतारमण

या योजनेसाठी सुमारे 3500 कोटी रुपये खरेच येणार आहे. एक देश एक रेशन कार्ड लागू होईल

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Photo Credits: Twitter)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजबाबत विस्तारीत माहिती दिली. पंतप्रधानांच्या पॅकेजबाबतची माहिती देण्यासाठी अर्थमंत्री सातत्याने पत्रकार परिषद घेत आहे. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, शेल्टर होममध्ये बेघर लोकांना 3 वेळचे अन्न मिळेल. त्यासाठी वेगळ्या निधीचीही तरतूद करण्यात आली आहे. ज्या लोकांकडे रेशन कार्ड किंवा इतर कोणतेच कार्ड नाही अशा नागरिकांनाही 5 किलो गहू, तांदूळ आणि एक किलो चना केंद्र सरकारकडून मदत म्हणून देण्यात येईल.

निर्मला सीतारमण यांनी म्हटले की, केंद्र सरकारच्या या योजनेचाल लाभ 8 कोटी मजूरांना होईल. या योजनेसाठी सुमारे 3500 कोटी रुपये खरेच येणार आहे. एक देश एक रेशन कार्ड लागू होईल. ज्यामुळे स्थलांतरीत मजूरही कोणत्याही राज्यातील स्वस्त धान्य दुकानातून आपल्या हक्काचे राशन खरेदी करु शकतील.

अर्थमंत्र्यांनी पुढे सांगितले की, मजूर कल्याण हा सरकारच्या अजेंड्यावरील सर्वात वरचा मुद्दा आहे. किमान मजूरी सध्यास्थितीत केवळ 30 टक्के कामगारांनाच लागू होते आहे. ही मर्यादा आम्ही सार्वत्रिक करण्याचा विचार करतो आहोत. सोबतच कामगार सुधारणा कायद्यातही बदल केला जात आहे. राज्यात परतलेल्या कामगारांना राज्य सरकारांनी काम द्यावे. त्यासाठी देशभर एक विशेष मोहिम चालवली जात आहे. त्यामुळे जर मजुरांची इच्छा असेल तर ते त्यांच्या राज्यातही आपल्या नावाची नोंदणी करु शकतात. (हेही वाचा, Atma Nirbhar Bharat Abhiyan: शेतकरी, कामगार, मजूरांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उघडला पेठारा; पाहा आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत घोषीत पॅकेजमधील विविध घोषणा)

एएनआय ट्विट

पुढे बोलताना निर्मला सीतारामण यांनी सांगितले की, शहरातील गरीबांना जेवण आणि घर देण्यासाठी आम्ही काम करत आहोत. ज्यामुळे शहरात राहणाऱ्या बेघरांना शेल्टर होममध्ये केंद्र सरकारच्या पैशातून तीन वेळचे अन्न दिले जाईल. मजूरांचे वेतन वाढविण्याबाबतही आम्ही काम करत आहोत, असेही निर्मला सीतारमण यांनी या वेळी सांगितले.